पुणे ग्रामीण पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या; पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:12 PM2021-08-20T12:12:33+5:302021-08-20T12:12:59+5:30

प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Transfers of 33 Police Officers in Pune Rural Police Force; Including police inspectors, assistant inspectors and sub-inspectors | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या; पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचाही समावेश

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या; पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचाही समावेश

googlenewsNext

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोठे फेरबदल केले आहेत. एका ठिकाणी २ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ११ पोलीस अधिकार्‍यांसह ३३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण 

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ (पौड - मुदतवाढ), भाऊसाहेब पाटील (यवत - मुदतवाढ), नारायण पवार (दौंड ते यवत), अशोक शेळके (जिल्हा विशेष शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा), विठ्ठल दबडे (आर्थिक गुन्हे शाखा ते भोर पो. स्टे), विनोद घुगे (नियंत्रण कक्ष ते दौंड), विलास देशपांडे (नियंत्रण कक्ष ते नारायणगाव) तयुब मुजावर (लोणावळा ग्रामीण ते इंदापूर) भगवंत मांडगे ( नियंत्रण कक्ष ते रांजणगाव), सुरेशकुमार राऊत (रांजणगाव ते शिरुर)
प्रविण मोरे (नियंत्रण कक्ष ते लोणावळा ग्रामीण) पदमाकर घनवट (स्थानिक गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा), प्रविण खानापूरे ( शिरुर ते नियंत्रण कक्ष). 

सहायक पोलीस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण 

संदीप येळे (रांजणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा), राहुल घुगे (सासवड ते बारामती तालुका), जीवन माने (भिगवण ते घोडेगाव), दिलीप पवार (वालचंदनगर ते भिगवण), बिराप्पा लातूरे (इंदापूर ते वालचंदनगर), नवनाथ रानगट (शिक्रापूर ते आळेफाटा), प्रमोद पोरे ( बारामती तालुका ते बारामती शहर), ऋषिकेश अधिकारी ( दौंड - मुदतवाढ). 

पोलीस उपनिरीक्षक आणि बदलीचे ठिकाण 

सतीश डोले (आळेफाटा ते घोडेगाव), राजेंद्र पवार (भोर ते आळेफाटा), शामराव मदने (वाचक -भोर विभाग -मुदतवाढ), दिलीप देसाई (वडगाव मावळ - मुदतवाढ), प्रकाश खरात (दौंड ते बारामती), बाळू पवार (वाचक -खेड विभाग ते नियंत्रण कक्ष), सुरेखा शिंदे (कामशेत ते लोणावळा शहर), सागर खबाले (मंचर ते सायबर), संजय धोत्रे (इंदापूर ते वाचक - खेड विभाग), प्रियांका माने (लोणावळा शहर ते यवत)
सुनिल मोटे (शिरुर ते वेल्हा पो. स्टे.). 

Web Title: Transfers of 33 Police Officers in Pune Rural Police Force; Including police inspectors, assistant inspectors and sub-inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.