पुण्यातील १३ पाेलीस उपायुक्तांच्या बदल्या; पुणे ‘लाचलुचपत’च्या अधीक्षकपदी अमाेल तांबे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 09:45 AM2022-11-08T09:45:22+5:302022-11-08T09:46:13+5:30
बाहेरील जिल्ह्यातून १६ अधिकारी पुण्यात आले, तर पुण्यातील १३ अधिकाऱ्यांना पुण्याबाहेर जावे लागले आहे..
पुणे : राज्याच्या गृहविभागाने साेमवारी पाेलीस दलात कार्यरत १०४ पाेलीस उपायुक्त, पाेलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील सात पाेलीस उपायुक्तांचा समावेश आहे. बाहेरील जिल्ह्यातून १६ अधिकारी पुण्यात आले, तर पुण्यातील १३ अधिकाऱ्यांना पुण्याबाहेर जावे लागले आहे.
पुण्यात आलेले अधिकारी :
संदीप सिंह गिल्ल (समादेशक राज्य राखीव पाेलीस बल, गट क्र. १२, हिंगाेली ते पाेलीस उपायुक्त, पुणे शहर), स्मार्तना एस. पाटील (पाेलीस अधीक्षक, पाेलीस बिनतारी संदेश विभाग पुणे ते पाेलीस उपआयुक्त पुणे शहर), सुहेल शर्मा (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते पाेलीस उपआयुक्त, पुणे शहर), विक्रांत देशमुख (अपर पाेलीस अधीक्षक जालना ते पाेलीस उपआयुक्त, पुणे शहर), अमाेल झेंडे (पाेलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण ठाणे, ते पाेलीस उपआयुक्त, पुणे शहर) शशिकांत बाेराटे (प्राचार्य, पाेलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा पुणे ते पाेलीस उपआयुक्त, पुणे शहर), विजय मगर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते पाेलीस उपआयुक्त, पुणे शहर), अमाेल तांबे (पाेलीस उपआयुक्त, परिमंडळ १ नाशिक शहर ते पाेलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे), राजलक्ष्मी शिवणकर (पाेलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पाेलीस अधीक्षक लाेहमार्ग पुणे), ए. एच. चावरिया (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत पाेलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), राजेश बनसाेडे (पाेलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ते पाेलीस अधीक्षक पाेलीस बिनतारी, पुणे), प्रवीण पाटील (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते समादेशक रा. रा. पाेलीस बल, गट क्र. १, पुणे) , दीपक पी. देवराज (पाेलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते समादेशक रा. रा. पाेलीस बल, गट क्र. २), आनंद भाेइटे (पाेलीस उपआयुक्त परिमंडळ २, पिंपरी चिंचवड ते अपर पाेलीस अधीक्षक, बारामती), एम. एम. मकानदार (पाेलीस उपआयुक्त, अमरावती शहर ते प्राचार्य पाेलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा, पुणे), स्वप्ना गाेरे ( प्राचार्य, पाेलीस प्रशिक्षण केंद्र साेलापूर ते पाेलीस उपआयुक्त पिंपरी चिंचवड).
पुण्यातून बदली झालेले अधिकारी :
प्रियंका नारनवरे (पाेलीस उपआयुक्त परिमंडळ १, पुणे शहर ते समादेशक, राज्य राखीव पाेलीस बल गट क्र. ४, नागपूर), भाग्यश्री नवटके (पाेलीस उपआयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर ते समादेशक रा. रा. पाेलीस बल, गट क्र. १७, चंद्रपूर), पाैर्णिमा गायकवाड (पाेलीस उपआयुक्त परिमंडळ ३, पुणे शहर ते समादेशक रा. रा. पाेलीस बल, गट क्र. १२, हिंगाेली), नम्रता पाटील / चव्हाण (पाेलीस उपआयुक्त पुणे शहर ते पाेलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई), राहुल श्रीरामे (पाेलीस उपआयुक्त, वाहतूक, पुणे शहर ते पाेलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), सागर पाटील (पाेलीस उपआयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर ते पाेलीस उपआयुक्त अमरावती शहर), विवेक पाटील (पाेलीस उपआयुक्त, पुणे शहर ते पाेलीस उपआयुक्त, पिंपरी चिंचवड), सदानंद वायसे-पाटील (पाेलीस अधीक्षक लाेहमार्ग, पुणे ते उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता, मुंबई), मिलिंद माेहिते (अपर पाेलीस अधीक्षक, बारामती ते अपर पाेलीस अधीक्षक, हिंगाेली), अभिनव देशमुख (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते पाेलीस उपआयुक्त मुंबई शहर), मंचक इप्पर (पाेलीस उपआयुक्त परिमंडळ १ पिंपरी चिंचवड ते पाेलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक), संभाजी कदम (सीआयडी पुणे ते पाेलीस उपायुक्त अमरावती), मंगेश शिंदे (समादेशक एसआरपीएफ गट २ पुणे ते पाेलीस उपायुक्त मुंबई शहर)
आयुक्तालयातील खांदेपालट
पुणे शहर आयुक्तालयातील प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पाैर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे, सागर पाटील, विवेक पाटील यांची बदली झाली आहे. तर संदीप सिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, विक्रांत देशमुख, अमाेल झेंडे, शशिकांत बाेराटे, विजय मगर यांची पुणे शहर आयुक्तालयात पाेलीस उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.