शहरातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; वाचा, तुमच्या भागात कुणाची नियुक्ती
By नितीश गोवंडे | Published: January 25, 2024 10:07 AM2024-01-25T10:07:53+5:302024-01-25T10:08:19+5:30
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले आहेत
पुणे : पुणेपोलिसआयुक्ताल्याच्या हद्दीतील १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले आहेत. यापूर्वी १५ जानेवारी रोजी वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे
१. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक वाहतूक
२. सुनील बाबुराव माने – वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा
३. रवींद्र मनोहर गायकवाड – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलिस ठाणे
४. दीपाली सचिन भुजबळ – गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर (बदली आदेशाधिन) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलिस ठाणे
५. हेमंत चंद्रकांत पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा
६. संदीप नारायण देशमाने – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस ठाणे
७. सुनील पांडुरंग जैतापूरकर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते कोर्ट कंपनी
८. अभय चंद्रनाथ महाजन – वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा
९. विजय गणपतराव कुंभार – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलिस ठाणे
१०. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा
११. गिरीश विश्वासराव दिघावकर – पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलिस ठाणे
१२. बालाजी अंगदराव पांढरे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःशृंगी पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-३
१३ नीलिमा नितीन पवार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा
१४. अश्विनी अनिल सातपुते – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलिस ठाणे
१५. नीलम शशिकांत भगत – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक कोर्ट आवार
१६. श्रीहरी रामचंद्र बहिरट – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-३ ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग)
१७. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१