पुणे शहर पोलिस दलातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सहायक पोलिस आयुक्तांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:52 AM2024-06-07T10:52:06+5:302024-06-07T10:52:29+5:30
यामध्ये ५ सहायक पोलिस आयुक्त, ५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ९ पोलिस निरीक्षक आणि २ उपनिरीक्षक यांचा समावेश आहे...
पुणे : शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी (दि. ६) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले. यामध्ये ५ सहायक पोलिस आयुक्त, ५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ९ पोलिस निरीक्षक आणि २ उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या...(कुठून - कुठे)
१) विठ्ठल दबडे - एसीपी विशेष शाखा १ ते एसीपी येरवडा विभाग
२) मच्छिंद्र खाडे - एसीपी वाहतूक शाखा ते एसीपी फरासखाना विभाग
३) जगदीश सातव - एसीपी वाहतूक शाखा ते एसीपी सिंहगड रोड विभाग
४) रंगनाथ उंडे - एसीपी आस्थापना ते एसीपी कोथरूड विभाग
५) व्यंकटेश देशपांडे - एसीपी वाहतूक शाखा ते एसीपी अभियान
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...(कुठून - कुठे)
१) संतोष पाटील - येरवडा पोलिस ठाणे ते विशेष शाखा
२) मनीषा पाटील - चंदननगर पोलिस ठाणे ते विशेष शाखा
३) कैलास करे - लोणीकंद पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा
४) विपीन हसबनीस - डेक्कन पोलिस ठाणे ते पोलिस निरीक्षक कल्याण
५) युसूफ शेख - उत्तम नगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष
६) मीनल सुपे-पाटील - सायबर पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा
७) गणेश उगले - पोलिस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष
८) अर्जुन बोत्रे - वाहतूक शाखा ते विशेष शाखा
९) सीमा ढाकणे - लोणीकंद पोलिस ठाणे ते विशेष शाखा
१०) रवींद्र शेळके - आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलिस ठाणे
११) संजय चव्हाण - आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलिस ठाणे
१२) सावळाराम साळगांवकर - विशेष शाखा ते लोणीकंद पोलिस ठाणे
१३) स्वप्नाली शिंदे - नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलिस ठाणे
१४) मोहन खंदारे - विश्रांतवाडी पोलिस ठाणे ते उत्तमनगर पोलिस ठाणे
पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या...(कुठून - कुठे)
१) संतोष सोनवणे - वानवडी पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष
२) किरण धायगुडे - लोणी काळभोर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष