Pune Rural Police: पुणे ग्रामीण पोलिस दलातील निरीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 03:01 PM2023-07-14T15:01:29+5:302023-07-14T15:03:01+5:30
ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी (दि. १३) बदल्या केल्या...
पुणे :पोलिस ठाण्यात २ वर्षे सेवा पूर्ण झालेले पोलिस निरीक्षक, तसेच पुण्यात बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी (दि. १३) बदल्या केल्या. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांची कामशेत पोलिस ठाण्याहून शिरूरला आणि अण्णासाहेब घोलप यांची सासवडहून राजगड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक, (सध्या कार्यरत) बदलीचे ठिकाण : उमेश तावसकर (जेजुरी) नियंत्रण कक्ष, महेश ढवण (पोलिस कल्याण शाखा), रांजणगाव, बळवंत मांडगे (रांजणगाव) मंचर पो. ठाणे. सचिन पाटील (राजगड) नियंत्रण कक्ष, विलास भोसले (वडगाव मावळ) सुरक्षा शाखा, सतीश डोहगर (मंचर) आर्थिक गुन्हे शाखा, संतोष जाधव (सुरक्षा शाखा) सासवड, बापूसाहेब सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा) जेजुरी पो. ठाणे.
पुणे ग्रामीण पोलिस दलात बदलून आलेले पोलिस निरीक्षक, दिलेले ठिकाण : बबन पठारे (नियंत्रण कक्ष), आण्णा पवार (आर्थिक गुन्हे शाखा), ललित वर्टीकर (नियंत्रण कक्ष), रवींद्र पाटील (कामशेत), कुमार कदम (वडगाव मावळ), दिनेश तायडे (बारामती शहर), सुभाष चव्हाण (नियंत्रण कक्ष), राजेश गवळी (पोलिस कल्याण शाखा), सूर्यकांत कोकणे (नियंत्रण कक्ष), सुहास जगताप (जिल्हा वाहतूक शाखा), शंकर पाटील (भाेर पो. ठाणे, परिपोउपअधीक्षक रेखा वाणी यांचे जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर).