Maharashtra: पुण्यासह राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या, उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:34 PM2024-04-09T12:34:06+5:302024-04-09T12:40:06+5:30
पुणे : सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यासह राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश, वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवाणी ...
पुणे : सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यासह राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश, वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांच्या प्रस्तावित बदल्यांचा आदेश काढला आहे.
या अंतर्गत पुण्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर, एस. बी. हेडाऊ, व्ही. डी. निंबाळकर, पोक्सो विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या राज्यातील अन्य जिल्हा न्यायालयांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्यरत न्यायाधीशांना पुणे जिल्हा न्यायालयात बदली देण्यात आली आहे. त्यात जळगाव येथील व्ही. सी. बर्डे यांच्यासह यू. एम. मुधोळकर आणि डी. के. अनभुले यांचा समावेश आहे. याशिवाय, दिवाणी न्यायालयातून एस. जे. भट्टाचार्य, महेंद्र बी. पाटील या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांची अन्य दिवाणी न्यायालयांमध्ये बदली करण्यात आली आहे.
तसेच, दिवाणी न्यायालयातून सी. आर. उमरेडकर, आर. एस. वानखेडे, व्ही. व्ही. कुलकर्णी, एम. आर. बर्गे, सी. एस. जगताप, जी. एस. खेडकर, एम. के. शेख, ए. जे. गिऱ्हे, आर. एस. गिरी, पी. सी. फटाळे, जी. आर. तिवारी, व्ही. के. पाटील, पी. ए. आपटे, एस. पी. कुलकर्णी या कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांची अन्य दिवाणी न्यायालयांमध्ये बदली करण्यात आली आहे.