राष्ट्रवादीच्या माध्यमातून इंदापूरचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:48+5:302021-03-28T04:09:48+5:30
शहरातील सरस्वती नगर येथे सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढवळे यांच्या शाळेसमोर ओपन जिमचे लोकार्पण राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या ...
शहरातील सरस्वती नगर येथे सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढवळे यांच्या शाळेसमोर ओपन जिमचे लोकार्पण राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेविका मधुरा ढवळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, धरमचंद लोढा, शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, शहर युवक कार्याध्यक्ष वसीम बागवान, राजेंद्र चौगुले, बाळासाहेब लोखंडे, अवधूत पवार, गफ्फुर सय्यद, ॲड आशुतोष भोसले आदी उपस्थित होते.
प्रदीप गारटकर म्हणाले की, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मे महिन्यापर्यंत ३५ कोटी रुपयांचा निधी इंदापूर शहराला मिळेल यामधून शहराच्या वैभवात भर पडेल, शहराचा विकासात्मक चेहरा बदलेल असे भव्य विकासकाम करता येईल. तूर्तास नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन गारटकर यांनी केले.
२७ इंदापूर जीम
सरस्वतीनगर येथे ओपन जिमचे उदघाटन करताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व इतर.