लोकवर्गणीतून पऱ्हाडवाडीच्या शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:42+5:302021-06-20T04:08:42+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षांपासून शाळा बंद आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षांपासून शाळा बंद आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत अध्ययनास अडचण येऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. शाळेच्या विकासासाठी पऱ्हाडवाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी जमा केली. या वर्गणीतून शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी, शौचालय दुरुस्ती, पाण्याची टाकी, नळव्यवस्था, हॅन्डवॅश स्टेशन, बोअरवेलसाठी विद्युत पंप, वर्तमानपत्र स्टँड, ग्रंथालय कपाट, संगणक प्रणाली अशा भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात शाळेला विस्तार अधिकारी मोरे व केंद्रप्रमुख सोनवणे यांनी अचानक भेट दिली असता, त्यांनीही शाळेच्या कायापालटबाबत समाधान व्यक्त करून ग्रामस्थांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथे लोकवर्गणीतून कायापालट केलेली जिल्हा परिषद शाळा. (छाया : भानुदास पऱ्हाड)