श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : दत्तात्रय भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:18+5:302021-09-11T04:11:18+5:30

नारायणगाव येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ...

Transparency of Shriram Patsanstha: Filling Dattatraya | श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : दत्तात्रय भरणे

श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : दत्तात्रय भरणे

Next

नारायणगाव येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ॲड. अशोक पवार, अतुल बेनके, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, महादेव वाघ, जि. प. सदस्य पांडुरंग पवार, देवराम लांडे, मोहित ढमाले, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष सुनील श्रीवत, संचालक शशिकांत वाजगे, अनिल थोरात, यल्लू लोखंडे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासणे, विजय घोगरे, सीताराम पाटे, शीला मांडे, नवनाथ चौगुले, आमीर तांबोळी आदी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष सुनील श्रीवत यांनी संस्थेच्या कामाबद्दल माहिती देताना म्हणाले की, सभासद संख्या ७ हजार ९०६ असून, ठेवी १३२ कोटी, नफा १ कोटी १४ लाख, भागभांडवल ५ कोटी २७ लाख आहे. संस्थेने सभासदांसाठी श्रीराम उत्सव मुदत ठेव योजना, कन्या ठेव योजना, लखपती ठेव योजना अशा प्रकारच्या अनेक योजना दि. १ सप्टेंबर २०२१ ते दिवाळीपर्यंत चालू केलेल्या आहेत. सूत्रसंचालन संतोष ढोबळे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे यांनी आभार मानले.

१० नारायणगाव श्रीराम पतसंस्था

श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पांडुरंग पवार, अमित बेनके, तानाजी डेरे, सुनील श्रीवत व इतर

100921\010.jpg

श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले , यावेळी पांडुरंग पवार , अमित बेनके , तानाजी डेरे , सुनिल श्रीवत व इतर मान्यवर .

Web Title: Transparency of Shriram Patsanstha: Filling Dattatraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.