कार्यप्रणालीत येणार पारदर्शकता, एनएसएसमधील कामकाज आॅनलाइन : गैरप्रकारालाही बसणार आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:59 AM2017-10-17T02:59:18+5:302017-10-17T02:59:34+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येणाºया स्वयंसेवकांच्या नोंदणीसह सर्व कामकाज आता आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्यामुळे खोटे विद्यार्थी दाखवून विद्यापीठाकडून अनुदान लाटण्याच्या प्रकाराला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येणाºया स्वयंसेवकांच्या नोंदणीसह सर्व कामकाज आता आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्यामुळे खोटे विद्यार्थी दाखवून विद्यापीठाकडून अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. तसेच एनएसएसच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमहदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्यातच राज्य शासनाने एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे याबाबतची नियमावलीत तयार केली आहे.त्यामुळे पुढील काळात एनएसएसच्या माध्यमातून नियोजनबध्द पध्दतीने काम होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एनएसएसच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती राज्य शासनाला विद्यापीठातर्फे पाठविली जाणार आहे. एनएसएस विभागातर्फे विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.त्यामुळे २०१६-१७ मध्ये नोंदविलेल्या एनएसएसच्या स्वयंसेवकांच्या माहितीमधून २०१७-१८च्या एनएसएसच्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ठ केले जाणार आहे. काही कारणास्तव द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला तर त्यांच्या जागी प्रथम
वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा पीआरएन क्रमांक बंधनकारक
४विद्यापीठातर्फे एनएसएसच्या विद्यार्थी संख्येनुसार महाविद्यालयांना निधी दिला जातो.त्यामुळे काही महाविद्यालयांनी अधिक विद्यार्थी असल्याचे सांगून निधी लाटल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात होती. मात्र,विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला.तसेच आॅनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पीआरएन क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी दाखवून निधी लाटता येणार नाही. परिणामी एनएसएसमधील गैरप्रकाराला आळा बसणार आहे.
विद्यापीठाच्या राट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, विद्यापीठाच्या एनएसएस कार्यालयातर्फे महाविद्यलयांकडून आॅनलाईन प्रस्ताव स्वीकारले जाणार
आहेत. तसेच संबंधित प्रस्तावांना आॅनलाईनच मंजुरी दिली जाईल.
आॅनलाईन मंजुरीमुळे महाविद्यालय व विद्यापीठाची वेळेची बचत होणार आहे.तसेच सर्व कामकाज ‘पेपर लेस’होणार आहे.त्याच प्रमाणे एनएसएस अंतर्गत केल्या जाणा-या सर्व कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे.