पारदर्शक कारभार करा; लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:59 AM2018-12-15T01:59:45+5:302018-12-15T02:00:02+5:30

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Transparently manage; Take the people's representatives into confidence- Girish Bapat | पारदर्शक कारभार करा; लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- गिरीश बापट

पारदर्शक कारभार करा; लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- गिरीश बापट

googlenewsNext

पुणे : स्मार्ट सिटीअतंर्गत नक्की काय कामे सुरु आहेत, कामांची निवड परस्पर केली जाते, प्रकल्प निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विचारात घेतले जात नाही, बैठकांना बोलाविले जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. यामध्ये त्वरित सुधारणा करा, संबंधित आमदार, नगरसेवकांच्या दर महिन्याला बैठका घ्या, कामरभार पादर्शक झाला पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सध्या शहरात सुरू असलेले व भविष्यात नव्याने सुरू करण्यात येणाºया प्रकल्पाची माहिती व चर्चा करण्यासाठी स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, आयुक्त सौरभ राव, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमांबाबत लोकप्रतिनिधींना माहिती मिळत नाही, बैठकांसाठी बोलविले जात नाही, रस्ते किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे प्रकल्प राबविताना विचारात घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. यापुढे संबंधित आमदार, नगरसेविकांच्या नियमित बैठका घेऊन माहिती द्या, तसेच मी स्वत: दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन स्मार्ट सिटीचे काय काम सुरू आहे, आढावा घेणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.

जगताप म्हणाले, की स्मार्ट सिटीला गेल्या दोन वर्षांत ३०१ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, यामध्ये १९४ कोटी केंद्र शासन, ९८ कोटी राज्य शासन आणि १०१ कोटी पुणे महापालिकेकडून उपलब्ध झाला आहे. यापैकी आतापर्यंत ११७ कोटींचा खर्च केला असून, तब्बल ४८० कोटींच्या कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या आहेत. तर आता पर्यंत १२ कामे पूर्ण झाली असून, २६ कामे सुरु आहेत. नव्याने १७ कामांचे टेंडर करण्यात आली असून, सात कामांचा डीपीआर करण्याचे काम सुरू आहे. शासनाकडून लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.

सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवा
स्मार्ट सिटी असो की पुणे महापालिका गेल्या काही वर्षांत प्रत्येक कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीने दोन वर्षांत सल्लागारांवर ३० ते ४० कोटी खर्च केले आहेत. या सल्लागारांनी काय कामे केली, जबाबदारी काय, किती कामे पूर्ण केली, याची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांना दिले.

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागारांचे सल्ले घेऊन केलेली अनेक कामे फसली असल्याचे शहरात झालेल्या उड्डाणपुलांच्या कामांवरून स्पष्ट होईल. त्यामुळे सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची बिलं देताना नक्की काय काम केले व शहराला उपयोग झाला का, याची खात्री केली पाहिजे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत स्पष्ट केले.

Web Title: Transparently manage; Take the people's representatives into confidence- Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.