तिन अवयवांचे एकाच वेळी प्रत्यारोपण
By admin | Published: June 29, 2017 03:43 AM2017-06-29T03:43:21+5:302017-06-29T03:43:21+5:30
सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने एकाच वेळी वेगवेगळ्या रुग्णांवर मूत्रपिंड, स्वादूपिंड आणि यकृताचे यशस्वीरित्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने एकाच वेळी वेगवेगळ्या रुग्णांवर मूत्रपिंड, स्वादूपिंड आणि यकृताचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले. हे प्रत्यारोपण १६ जून रोजी करण्यात आले. पश्चिम भारतातील एकाच केंद्रामध्ये एकाच वेळी मूत्रपिंड, स्वादूपिंड तसेच यकृत प्रत्यारोपण वेगवेगळ्या रुग्णांवर प्रथमच करण्यात आले आहे. महाराष्ट्रात करण्यात आलेले हे दुसरेच मूत्रपिंड व स्वादूपिंड प्रत्यारोपण आहे.
४१ वर्षांच्या व्यक्तीला अपघातानंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. या व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयवदानाची तयारी दाखवल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले.
अपघातात बळी ठरलेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड व स्वादूपिंड चेन्नईतील २७ वर्षीय आयटी व्यावसायिक असलेल्या रुग्णाला देण्यात आले. मधुमेहामुळे रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाले होते. ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत बारामतीतील एका ६२ वर्षीय रुग्णाला देण्यात आले. दोन्ही प्रत्यारोपणांसाठी साधारणपणे नऊ तासांचा कालावधी लागला.