ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल ; नातेवाईकांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:34 PM2018-10-17T15:34:13+5:302018-10-17T15:36:03+5:30

दोन महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात या महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.

Transplantation of women's dead bodies at Sasoon Hospital ; problems to relatives | ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल ; नातेवाईकांना मनस्ताप

ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल ; नातेवाईकांना मनस्ताप

Next
ठळक मुद्देदुःखद प्रसंगी नातेवाईकांना भयंकर मनस्ताप

पुणे : ससून रुग्णालयात मंगळवारी सकाळी दोन महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याबाबतची माहिती अशी, जया सपकाळ (वय ३९, रा़ रामटेकडी) यांचे सोमवारी निधन झाले होते़. त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले़. त्याठिकाणी आणखी एक मयुरी काळे (वय २०) यांचा मृतदेह आणण्यात आला होता़.काळे आणि सपकाळ या दोन्ही महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दोन्ही सारख्याच केसेस असल्याने ही अदलाबदल झाली असल्याचे ससून रुग्णालयातून सांगण्यात आले़. 
सिंहगड पोलीस व काळे यांचे नातेवाईक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ससून रुग्णालयातील शवागारात आले़. पोलिसांच्या उपस्थितीत काळे यांच्या नातेवाईकांकडे मृतदेह ताब्यात देण्यात आला़. ते अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन गेले़. त्यानंतर सपकाळ यांचे नातेवाईक दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह घेण्यासाठी ससून रुग्णालयात आले होते़. त्यांनी अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली होती़. रुग्णवाहिकाही बोलविण्यात आली़. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते शवागारात गेले़. त्यांनी मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, ही दुसरीच महिला आहे़.आपल्याकडून मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली़. शोधाशोध केल्यावर दोन ते तीन तासांपूर्वी काळे या महिलेचा मृतदेह म्हणून सपकाळ यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले़. इकडे अंत्यसंंस्कारासाठी मयुरी काळे यांचा मृतदेह घेऊन गेलेल्या नातेवाईकांनाही हा मृतदेह तिचा नसल्याचे लक्षात आले़. त्याचवेळी त्यांना ससून रुग्णालयातून फोन गेल्यावर सर्व प्रकाराचा उलगडा झाला़. त्यांना मृतदेह परत आणण्यास सांगण्यात आले आहे़. काळे यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन पुन्हा ससून रुग्णालयात आले. व तोपर्यंत सपकाळ यांचे नातेवाईक शवागारापाशी तटकळत बसून होते़. 

Web Title: Transplantation of women's dead bodies at Sasoon Hospital ; problems to relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.