कोणार्क एक्स्प्रेस मधून गांजाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:54+5:302021-09-24T04:11:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोणावळा स्थानकावर मुंबईच्या दिशेने कोणार्क एक्स्प्रेस गेल्यानंतर फलाट दोन वर आरपीएफ व लोहमार्ग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणावळा स्थानकावर मुंबईच्या दिशेने कोणार्क एक्स्प्रेस गेल्यानंतर फलाट दोन वर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांना दोन संशयित बेवारस बॅग आढळली. बॅगेची पाहणी केली असता त्यात १८ किलो गांजा आढळून आला. त्याचे बाजारमूल्य जवळपास २ लाख ६८ हजार पाचशे रुपये इतके आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात पुणे लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी मध्य रात्री एकच्या सुमारास (गाडी क्रमांक ०१०२० ) कोणार्क एक्स्प्रेस लोणावळा स्थानकाच्या फलाट दोन वर दाखल झाली. गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्त होताच आरपीएफचे रमेश बाविस्कर व लोहमार्गचे अनिल जाधव यांना दोन बॅगा बेवारस अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी अन्य प्रवाशाकडे बॅगेची चौकशी केली. मात्र सर्वांनी बॅग आपली नसल्याचे सांगितले.बॅगेची पाहणी करताच त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून तो पुणे लोहमार्ग पोलिसांकडे तो वर्ग केला आहे.