वाहतूक परवाना परीक्षा ही आयुष्यातील जबाबदारीची परीक्षा -झगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:18+5:302021-03-07T04:10:18+5:30
मार्गासनी : शालेय जीवनामध्ये लहानपणापासून युवावस्थेपर्यंत प्रत्येकाने लहान-मोठ्या परीक्षा दिल्या आहेत. परंतु वाहतूक परवाना मिळवण्याची परीक्षा ही आयुष्यातील ...
मार्गासनी : शालेय जीवनामध्ये लहानपणापासून युवावस्थेपर्यंत प्रत्येकाने लहान-मोठ्या परीक्षा दिल्या आहेत. परंतु वाहतूक परवाना
मिळवण्याची परीक्षा ही आयुष्यातील मोठ्या जबाबदारीचा परीक्षा असल्याचे प्रतिपादन मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे
यांनी केले.
वेल्हे येथे मंगळवार (ता.२) रोजी आयोजित परवानाधारकांच्या मेळाव्यात झगडे बोलत होते. या वेळी प्रादेशिक परिवहन
अधिकारी डॉ.अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक
संतोष झगडे, अभिजित गायकवाड, अनिल खेमनार, दत्तात्रय गाढवे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. झगडे म्हणाले की,
दुचाकी वाहन चालविताना महिलांनी विशेषता काळजी घेतली पाहिजे. यामध्ये ओढणी, स्कार्प, साडीचा पदर लोंबता राहून चाकात अडकल्याने
अनेक मोठे अपघात झाले आहे. याबाबत काळजी घेतली पाहिजे तर हेल्मेट वापर सक्तीचा आहे, चारचाकीमध्ये सीट बेल्ट लावणे, लेनची शिस्त पाळणे, वळण्यापूर्वी योग्य तो इशारा देणे, गाडी ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने करणे, प्रखर किंवा रंगीत दिव्याचा वापर करू नये,
वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, वेगावर नियंत्रण ठेवावे, कर्कश हार्न बसवू नये, मद्यपान करून वाहन चालवू नयेत अशा सूचना देऊन वाहतुकीचे
नियम पाळण्याची शपथ घेण्यात आली.
चौकट
वेल्हे तालुक्यात आयोजित वाहतूक परवाना मेळाव्यामध्ये आलेल्या उमेदवारांना नेटवर्कचा मोठा फटका बसला. वेल्हेमध्ये नेटवर्क नसल्याने
अनेकांची ऑनलाईन कामे न झाल्याने दिवसभर थांबावे लागल्याने दुर्गम भागातील लागले नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तर ऑनलाई साठी विविध मोबाईलचे
नेटवर्क घेऊनही कामात मोठा अडथळा येत असल्याचे मोटर वाहन निरीक्षक संतोष झगडे म्हणाले.
फोटोसाठी ओळ- वेल्हे (ता.वेल्हे) येथील आयोजित वाहतूक परवाना मेळाव्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ देताना मोटर वाहन निरीक्षक संतोष झगडे.