पुणे-नगर रस्त्यावर वाहतूककोंडी

By Admin | Published: April 22, 2017 03:31 AM2017-04-22T03:31:24+5:302017-04-22T03:31:24+5:30

पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पीएमपी बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक जखमी झाला आहे.

Transportists on the Pune-city road | पुणे-नगर रस्त्यावर वाहतूककोंडी

पुणे-नगर रस्त्यावर वाहतूककोंडी

googlenewsNext

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पीएमपी बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे ४ तास वाहतूककोंडी झाली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागले. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोरेगाव भीमा येथे वाडागाव फाट्यासमोर पुण्याकडून शिक्रापूरकडे जाणाऱ्या पीएमपी बस येत असताना वाडागाव फाटा येथे एका टेम्पोवर आदळली. या अपघातात बसचालक अश्रुफा मोहन खोचरे जखमी झाले. अपघातानंतर पुणे बाजूने येणाऱ्या वाहनांच्या दोन रांगांपैकी एकच रांग धीम्या गतीने सुरू होती. चार वाजेपर्यंतदेखील येथील बस बाजूला करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पुणे, येरवडा, हडपसर आदी ठिकाणांहून रांजणगाव तसेच सणसवाडी औद्योगिक वसाहतीकडे येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे येथे वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. अनेक वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने आणल्यामुळे कोंडी भर पडली़ यानंतर डिंग्रजवाडी येथील उद्योजक विकास गव्हाणे व सागर गव्हाणे यांनी क्रेन उपलब्ध करून दिल्यानंतर वाहन बाजूला करण्यात आले. बसचे चाक जाम झाल्यामुळे दोन क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला करण्यात तब्बल चार तासांनी यश आले. त्यानंतर येथील वाहतूक साडेचारनंतर सुरळीत झाली होती.

क्रेनच उपलब्ध नसल्याने वाहतूककोंडी
वाडागाव फाट्याजवळ बस व टेम्पोचा अपघात झाला. बस बाजूला करण्यासाठी क्रेन उपलब्ध न झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्यानंतर वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता वाहन बाजूला करण्यासाठी क्रेन उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.

Web Title: Transportists on the Pune-city road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.