सात बारासाठी लाच मागणाऱ्या ‘तलाठी मँडम’ जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:30+5:302021-02-14T04:12:30+5:30

पुणे : सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी आणि जमीन वाटपाची नोंद यासाठी प्रत्येकी २० अशी ४० हजारांची लाच घेणाऱ्या भीमा कोरेगावातील ...

In the trap of 'Talathi Mandam' asking for bribe for seven or twelve | सात बारासाठी लाच मागणाऱ्या ‘तलाठी मँडम’ जाळ्यात

सात बारासाठी लाच मागणाऱ्या ‘तलाठी मँडम’ जाळ्यात

googlenewsNext

पुणे : सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी आणि जमीन वाटपाची नोंद यासाठी प्रत्येकी २० अशी ४० हजारांची लाच घेणाऱ्या भीमा कोरेगावातील तलाठी महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे आणि खासगी व्यक्ती निवृत्ती लक्ष्मण कानगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने तलाठी कोकाटेकडे सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी आणि जमीन वाटप नोंदीसाठी कागदपत्रे सादर केली होती. या कामासाठी तलाठी कोकाटेने ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला.

मध्यस्थ कानगुडेने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर जवळच असलेल्या तलाठी कोकाटेनी २० हजार रुपये लाच स्वीकारली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In the trap of 'Talathi Mandam' asking for bribe for seven or twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.