कचरा डेपोला एकजुटीने विरोध

By admin | Published: May 6, 2017 02:44 AM2017-05-06T02:44:07+5:302017-05-06T02:44:07+5:30

पुणे महापालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनली असल्याने घनकचरा पिंपरी सांडस येथील हद्दीतील

Trash depotola unitedly | कचरा डेपोला एकजुटीने विरोध

कचरा डेपोला एकजुटीने विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी सांडस : पुणे महापालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनली असल्याने घनकचरा पिंपरी सांडस येथील हद्दीतील वनजमिनीमध्ये टाकण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे या परिसरातीली गावांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याला विरोध करण्यासाठी पिंपरी सांडससह परिसरातील गावे शुक्रवारी आष्टापूर येथे एकत्र इाली. त्यांनी तीव्र विरोध केला असून, १५ मे रोजी वाघोली येथे रास्तो रोकाचा इशारा दिला आहे.
अष्टापूर फाटा येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी वाघोली, केसनंद, शिरसवडी, वाडेबोल्हाई, बिवरी, अष्टापूर, हिंगणगाव, शिंदेवाडी, न्हावी सांडस, सांगावी सांडस, पिंपरी सांडस, बुर्केगाव, डोंगरगाव, पेरणे, बकोरी, लोणीकंद, तुळापुर, वढू, वाडेगाव, भवरापूर या परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमध्ये कचरा डेपोबाबत शासनाने माघार न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले.
पिंपरी सांडस येथील हद्दीतील गट क्र. ४९३ या वन विभागाच्या जागेमध्ये टाकण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. शासनाने वेळीच कचराडेपो बंद करावा अन्यथा शांततामय मार्गाने आंदोलन करण्याऐवजी शासनाविरोधात आम्ही उग्र स्वरूपात आंदोलन करू, अशी माहिती समितीचे सचिव सतीश भोरडे यांनी दिली.

Web Title: Trash depotola unitedly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.