ट्रॉमा सेंटर, हेलिपॅड धूळ खात; शासन उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:19 AM2018-09-16T02:19:33+5:302018-09-16T02:20:19+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांसाठी केली उभारणी

Trauma Center, Helipad dirt; Government indifferent | ट्रॉमा सेंटर, हेलिपॅड धूळ खात; शासन उदासीन

ट्रॉमा सेंटर, हेलिपॅड धूळ खात; शासन उदासीन

Next

वडगाव मावळ : पुणे- href='http://www.lokmat.com/topics/mumbai/'>मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळण्यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रॉमा सेंटर व हेलिपॅडची उभारणी केली. गेल्या चार वर्षांपासून ही इमारत धूळ खात आहे. याबाबत शासनाला कधी जाग येणार, असा प्र्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे हा ९३ किलोमीटर लांबीचा महामार्ग २००२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. हा मार्ग उपयुक्त आणि सोईचा असला तरी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हजारो प्रवाशांचे बळी गेले आहेत.
खोपोली व कळंबोलीदरम्यान होणाºया अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कळंबोली तर किवळे ते खंडाळादरम्यानच्या अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालय असे दोनच पर्याय आहेत. परंतु या दोन्ही ठिकाणी जखमींना नेण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. प्राथमिक उपचाराविना अनेक वेळा जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
महामार्गावर अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उभारलेल्या ट्रामा सेंटर प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अपघातातील जखमींची गैरसोय होत आहे. हस्तांतराच्या वादात हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाला कधी जाग येणार
गेल्या चार वर्षांपासून ही इमारत बांधून धूळ खात आहे. इमारतीला गवताचा वेढा आहे. हेलीपॅड उखडले आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सोळा वर्षांत बळींची संख्या काही हजारांवर गेली आहे. अजून किती बळी गेल्यावर हे सेंटर कार्यान्वित करण्यासाठी शासनाला जाग येईल, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Web Title: Trauma Center, Helipad dirt; Government indifferent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.