ट्रॅव्हल एजंट संघटनेचे ‘व्यावसायिक मॉडेल’
By admin | Published: October 12, 2016 02:55 AM2016-10-12T02:55:51+5:302016-10-12T02:55:51+5:30
पर्यटन क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणे’ या पर्यटन व्यावसायिकांच्या
पुणे : पर्यटन क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणे’ या पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेने आयएसओच्या धर्तीवर एक व्यावसायिक मॉडेल तयार केले आहे. यामध्ये संघटनेच्या सदस्यांना ग्राहकांना सेवा देताना पाळावयाची नियमावली तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहाकांना चांगली सेवा मिळण्याबरोबरच त्यांची फसवणूकही टळणार आहे.
पर्यटन क्षेत्राचा अनुभव नसणारे अनेक जण या क्षेत्रात येत असल्याने फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. तसेच आॅनलाईन पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधातही ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. या सर्वांचा परिणाम प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या ट्रॅव्हल एजंटांच्या व्यवसायावर होत होता. त्यामध्ये संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच त्यांचा विश्वास वाढण्यासाठी व्यावसायिक सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयएसओच्या धर्तीवर संघटनेने सदस्यांसाठी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. सेवा देण्याचे एक व्यावसायिक मॉडेल सवार्नुमते तयार करण्यात आले आहे.
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणेचे संचालक नीलेश भन्साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मॉडेल पूर्णत: ग्राहकाभिमुख ठेवण्यात आले आहे. एखादा नवीन व्यावसायिक दाखल झाला तर त्याचे शॉप अॅक्ट लायसेन्स, सेल्स टॅक्स नंबर व इतर कागदपत्रांची खात्री करून घेतल्यानंतरच त्याला संघटनेचे सदस्य केला जाईल.
सेवा देणाऱ्या प्रत्येक एजंटला त्याने दिलेल्या सेवेच्या दर्जानुसार नामांकित करण्यात येणार आहे. डिफॉल्टर कंपनींची माहितीही यापुढे संघटनेच्या सदस्यांमध्ये शेअर केली जाणार आहे. या डिल्फॉल्टर कंपनीला संघटनेत स्थानही दिले जाणार नाही. तसेच बिल थकविणाऱ्या ग्रांहकाची नावे ही सर्व ट्रॅव्हल कंपन्यांकडे दिली जाणार आहेत.
(प्रतिनिधी)