४१ पर्यटकांची ट्रॅव्हल एजंटने केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:26 AM2018-05-10T03:26:29+5:302018-05-10T03:26:29+5:30

: पुणे ते गोरखपूर रेल्वेसाठी ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या तिकिटे देण्याचा बनाव करून एका ट्रॅव्हल एजंटने ४१ पर्यटकांची फसवणूक केली. सोमवारी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

travel agents News | ४१ पर्यटकांची ट्रॅव्हल एजंटने केली फसवणूक

४१ पर्यटकांची ट्रॅव्हल एजंटने केली फसवणूक

Next

हडपसर : पुणे ते गोरखपूर रेल्वेसाठी ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या तिकिटे देण्याचा बनाव करून एका ट्रॅव्हल एजंटने ४१ पर्यटकांची फसवणूक केली. सोमवारी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
फिरायला जाणाऱ्या ग्रुपने यापूर्वी आॅनलाइन तिकिटे आरक्षित केली होती व प्रतीक्षा यादीत होती, त्यांनी प्रवासी एजंट सरबजीत सिंग होरा यांना जस्ट डायलद्वारे शोधले आणि त्यांनी आपली सेवा देण्याचे ठरवले. कारण, त्यांनी त्यांना कन्फर्मड तिकीट देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. पर्यटकांकडून पैसे गोळा केल्यानंतर होरा नाहीसा झाला.
हडपसर येथील फिरण्यास जाणाºयापैकी एकाने सांगितले, की जेव्हा होरा आम्हाला भेटला, तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वास दिला, की पुणे-गोरखपूर रेल्वे गाडीत आम्हाला आरक्षणाचे आरक्षण मिळेल. त्याने नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतीक्षा यादी तिकीट रद्द करण्यास सांगितले.
हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सतीश उमरे यांनी सांगितले, की होरा यांनी डॉ. प्रसाद भोसले यांना ५६ हजार रुपये किमतीची विमानाची पुण्याहून चंडीगडला २४ मार्चला जाण्यासाठी तिकिटे दिली होती.

तिकिटाची किंमत ६०० रुपये आहे, ज्यामुळे ४० लोकांसाठी २४ हजार रुपये आम्ही २० हजार रुपये गोळा केले आणि २४ फेब्रुवारीला मी माझ्या निवासस्थानाला भेट देऊन होराला दिले. परंतु, तिकिटे मिळवून देण्यास अयशस्वी ठरले आणि आम्हाला काही पैसे परत देण्यास नकार दिला, असे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. त्यांना फसविल्याबद्दल ते म्हणाले, ‘आम्हाला त्यांच्या पत्रातून होराचा पत्ता आला आणि हडपसर येथील हांडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याच्या भावाने आम्हाला सांगितले, की होराने अशा पद्धतीने असंख्य लोकांना फसविलेले आहे.

Web Title: travel agents News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.