पुणे मनपाची 10 रुपयांमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात कोठेही प्रवास करा योजना लवकरच होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 09:50 PM2021-05-19T21:50:56+5:302021-05-19T21:53:45+5:30
Pune News : PMPML च्या 50 बसची खरेदी केली असून त्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत.
पुणे - पुणे महानगरपालिका तर्फे PMPML ची बसने पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये ज्यास्त प्रवास करत यावा या दृष्टीकोणातून हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती यांनी 10 रुपयांमध्ये पुणे शहरात मध्यवर्ती भागात कोठेही प्रवास करा ही अभिनव योजना पुणे मनपाच्या अर्थसंकल्पात मांडली होती ती आता लवकरच पुर्णत्वास येत आहे. यासाठी लागणाऱ्या PMPML च्या 50 बसची खरेदी केली असून त्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत.
हेमंत रासने यांनी त्यांची पाहणी केली असून या बसेसचा लवकरच लोकार्पण सोहळा करून त्या पुणेकरांच्या सुलभ प्रवासासाठी PMPML कडे उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. तसेच येत्या काळात 300 नवीन बसेस स्थायी समितीच्या माध्यमातून खरेदी करून दिल्या जातील त्या माध्यमातून पुणे शहराचे वाहतुकीच्या दृष्टीने 6 झोन तयार करून त्यानुसार प्रवासाची आखणी केली जाणार आहे त्यानुसार नागरिकांना प्रवासाचा लवकरच लाभ घेता येणार आहे.