सायकल घेऊन करा मेट्रोने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:05+5:302021-03-10T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सायकलप्रेमींसाठी खास आनंदवार्ता. मेट्रोचा प्रवास सायकलप्रेमींना आपली सायकल बरोबर घेऊनही करता येईल. ‘सायकलींचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील सायकलप्रेमींसाठी खास आनंदवार्ता. मेट्रोचा प्रवास सायकलप्रेमींना आपली सायकल बरोबर घेऊनही करता येईल. ‘सायकलींचे शहर’ ही जुनी ओळख व सायकलचे महत्व लक्षात घेऊन महामेट्रोने हा निर्णय घेतला आहे.
नागपूरमध्ये याआधीच महामेट्रो कंपनीने हा निर्णय घेतला. नागपूरकर सायकलप्रेमींनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तोच निर्णय पुण्यातही घेतल्याची माहिती महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना काहीही अडचण येणार नाही. स्थानकात येण्याजाण्यासाठी लिफ्ट, जिने अशा व्यवस्था आहे. त्यामुळे सायकल घेऊन थेट फलाटावर जाता येईल. डब्यातील जागाही सायकल घेऊन उभे राहता येईल, अशी आहे. मेट्रो सुरू होण्यासाठी आता पुणेकरांना फारच थोडी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सोनवणे म्हणाले.
चौकट
“महामेट्रोने सुरूवातीपासून पर्यावरणाला महत्व दिले आहे. काही हजार वृक्षांची लागवड हे त्याचेच उदाहरण आहे. विजेच्या वापरासाठी सौरऊर्जा, स्थानकांमध्ये पाण्यावर पुनर्प्रक्रिया ही त्याची उदाहरणे आहेत. सायकल घेऊन प्रवास हा त्याचाच एक भाग आहे.”
-डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो