वरवेत ट्रॅव्हलर बस उलटली, एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:30 AM2018-03-19T00:30:40+5:302018-03-19T00:30:40+5:30
पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द गावाच्या हद्दीत पहाटे एकच्या दरम्यान नवलाई ट्रॅव्हर्लची आरामगाडी महामार्गालगत पलटी झाल्याने या अपघातात एक जण ठार तर अन्य १२ जण जखमी झाले आहेत.
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द गावाच्या हद्दीत पहाटे एकच्या दरम्यान नवलाई ट्रॅव्हर्लची आरामगाडी महामार्गालगत पलटी झाल्याने या अपघातात एक जण ठार तर अन्य १२ जण जखमी झाले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक मोहन तलबार यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ज्ञानेश्वर महादेव थोरात (वय २९, रा. माळशिरस) यांचा मृत्यू झाला तर संतोष श्रीमंत कदम (वय ३६, रा. डोंगरगाव, सोलापूर), शिरीष मिरोकोर (रा. पनवेल, मुंबई), उत्तम साळमाडगे (वय २३, लोणार, मंगळवेढा), अभिजित साळमाडगे (वय ५, रा. लोणार, मंगळवेढा), श्रीमंत मुरुमले (वय ५९, रा. घेरडी, सांगोला), वंदना यादव (वय ४४, रा. बुड, सांगली), मयूरी खुडे (वय २६, रा. शेगाव, जत), विजय विठ्ठल बाबर (वय २७, रा. डोंगरगाव, सोलापूर), संतोष सौदागर चव्हाण (वय २९, रा. सोनन, सांगोला), मीराबाई तुकाराम हिप्परकर (वय ४०, रा. शिगमळा, जत), अधिराज माने (वय १, रा. वीरनाड, जत), लतिका तानाजी इंगळे (वय ४२, रा. फरेवाडी, ता. मंगळवेढा) हे जखमी झाले आहेत. या सर्वांना नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडले असून जखमीपैकी तिघे गंभीर जखमी आहेत, ते उपचार घेत आहेत. नवलाई ट्रॅव्हलर्सची आरामगाडी कळंबोली येथून सुटल्यानंतर खेड-शिवापूर टोलनाका सोडल्यानंतर वरवे गावच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बसचालकाच्या बाजूस एका अंगावर पलटी झाली.