दिवाळीत प्रवाशांचं दिवाळं
By admin | Published: October 28, 2016 04:30 AM2016-10-28T04:30:56+5:302016-10-28T04:30:56+5:30
दिवाळसणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेऱ्या वाढवतानाच प्रवाशी भाड्यात वाढ करून ऐन दिवाळीत
बारामती : दिवाळसणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेऱ्या वाढवतानाच प्रवाशी भाड्यात वाढ करून ऐन दिवाळीत
दिवाळं काढणारी ‘दिवाळी भेट’ देऊ केली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किमान २५-३० टक्क्यांची वाढ केली आहे.
बारामती आगाराने जादा गाड्यांची सोय केली आहे. फेऱ्यांची सं्ख्या दुप्पट केली आहे. सुरक्षीत प्रवासासाठी एसटीचा पर्याय प्रवाशी निवडतात. मात्र, १४ नोेव्हेंबर पर्यंत जादा भाड्याची आकारणी होणार असल्याने प्रवाशी वर्गात नाराजी आहे.
दिवाळी निमित्त नोकरदार, कामगारवर्ग, शाळा. महाविद्यालयांना सुटी असते. या दरम्यान प्रवाशी संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ झालेली असते. त्यामुळे सहाजिकच एसटीवर प्रवाशांचा भार वाढतो. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटी बसलाच पसंती दिली जाते. मात्र राज्य परिवहन विभागाच्या वाढीव दराच्या निर्णयामुळे सर्वसमान्य प्रवासीवर्गाच्या खिशाला फटका बसणार आहे. राज्य परिवहन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. यामध्ये दि. २२ ते दि. २४, दि. २८ ते दि. २ नोव्हेंबर, दि. ५ ते दि. ६ व दि. १२ ते दि. १४ नोव्हेंबर या तारखांना ही भाडेवाढ आकारण्यात येणार आहे.
१२८ अधिक
बस सोडणार
दि. २५ ला ६० जादा बस तर दि. २६ ते १ नोव्हेंबर पर्यंत १२८ जादा बस सोडण्यात येणार आहेत. तर बारामती आगारातून दिवाळी काळात शिर्डी, सोलापूर, सांगली, माहूरगढ, दादर, बोरीवली, तुळजापूर यामार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती बारामतीचे आगारप्रमुख आर. डी. मोरे व सहायक वाहतूक निरिक्षक आय. एम. सय्यद यांनी दिली. शाळा, महाविद्यालयांना सुटया लागण्याने गाड्यांचा वापर सणाच्या काळात होणार आहे.