काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 11:07 AM2020-12-26T11:07:11+5:302020-12-26T11:29:20+5:30
चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील 29 प्रवासी सुखरुप
पुणे (कदमवाकवस्ती) : लातूरवरून पुुुुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सकाळी पावणे आठच्या दरम्यान पेट घेतला.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणी काळभोरपोलिसांच्यासह अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बसचा टायर फुटल्य़ाने, टायरसह बसलाही आग आगली. बस चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील २९ प्रवाशी मात्र सुखरुप बाहेर पडले.
लोणी काळभोरपोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लातुर जिल्हातील मुखेडहुन पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वाती ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे रवाना झाली होती. यात अकरा महि्लांसह २९ प्रवाशी प्रवास करत होते. वरील बस आज (शऩिवारी) सकाळी उरुळी कांचन जवळ बंद पडली. यावेळी बस चालकाच्या छोट्याशा प्रयत्नानंतर बस चालु झाली. ही बस लोणी काळभोरहुन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ येताच, बसचा उजव्या बाजुचा मागील टायर फुटला. टायर फुटताच टायरने प्रथम पेट घेतला. टायरने पेट घेतल्याचे लक्षातच, बस चालकाने बस रस्त्याच्या एकता बाजुला घेऊन, बस मधील प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशी बस मधुन खाली उतरत असतानाच, बसनेही मागील बाजुकडुन अचानक पेट घेतला. बसमधील प्रवाशी उतरले असले तरी, प्रवाशांचे खाण्यापिण्याचे साहित्य, प्रवाशी बॅग जळुन खाक झाली.
दरम्यान आगीची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांच्यासह वाघोली व हडपसर येथील अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर,महामार्ग पोलीसचे युवराज नांद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊऩ, बसमधील प्रवाशांना धिर देण्याबरोबरच प्रवाशांना त्यांच्या घऱी जाण्यासाठी मदत केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.