वर्तमानपत्राच्या रद्दीतून शब्दांच्या खजिन्याचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:38 AM2018-10-29T02:38:03+5:302018-10-29T02:38:19+5:30
डायनॅमिक विद्यालयातील उपक्रम; वाचन, लेखन, भाषा व सामान्यज्ञान
चासकमान : कडूस (ता.खेड) विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबरोबरच मराठी विषयाची वाचनाची आवड निर्माण व्हावी सवय लागावी चालू घडामोडी कळाव्यात या उद्देशाने कङूस येथिल डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्याथर्यांनी एक नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून भाषा, लेखन, सुधारणा व्हावी या उद्देशाने प्रकल्पाअंतर्गत वर्तमानपत्रातील अवघड शब्दांचा शोध घेऊन,जोड अक्षरे शोधणे, वर्तमानपत्रातील रद्दीचा दुहेरी उपयोग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, भाषा, अवघड शब्दांचा सराव करण्यासाठी केला जात असल्याने पालकांकङून कौतुक केले जात आहे.
डायनॅमिक स्कूल मधील विद्यार्थी नित्य नियमाप्रमाणे दररोज सकाळच्या प्रहरी वर्तमानपत्रातील चालू घडामोडी वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्याचे वाचन करत असतात.तसेच सकाळच्या प्रहरी शाळेत घेण्यात येणाºया प्रार्थनांमध्ये सर्व विद्यार्थीन समोर ठळक घडामोडी बरोबरच वाचन करत असल्याने या सुंदर उपक्रमाचा परिसरत चर्चचा विषय ठरत असून इतर शाळांनी हा उपक्रम राबविल्यास विद्याथीर्नां येणारी अडचण दुर होण्या बरोबरच साध्य होईल. या उपक्रमा विषयी विद्याथीर्शी बातचीत केली असताना बोलताना विद्यार्थी म्हणाले, आम्ही स्वत:हून नित्य नियमाने दहा मिनिटे वृत्तपत्र वाचन करण्या बरोबरच वृत्तपत्रांचा आम्ही दुहेरी उपयोग करत असतो.
या मध्ये लेखन भाषा सुधारण्यासाठी कठीण शब्द वाचताना होणारी अडचण दुर करण्यासाठी, चालू घडामोडी समजाव्यात, जडरलनाँलेज वाढविण्यासाठी अवघड शब्दांचा शोध घेणे, जोड अक्षरे शोधणे, गावांची नावे यांचा शोध घेऊन लिखाण करण्यात आम्ही विद्यार्थी शाळा भरण्या अगोदर वेळेचा दुरउपयोग न करता'वेळ वाया न घालवता'मोकळ्या वेळात पंधरा मिनिटे रमुन जात असतो.