वनमहोत्सावातील वृक्षलागवड जळायला लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:21+5:302021-03-30T04:09:21+5:30
शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई खैरेवाडी, हिवरे, कुंभार या रस्त्यावरील वनीकरण मार्फत लावण्यात आलेल्या झाडांना ट्रॅक्टर द्वारे पाणी घालण्यात ...
शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई खैरेवाडी, हिवरे, कुंभार या रस्त्यावरील वनीकरण मार्फत लावण्यात आलेल्या झाडांना ट्रॅक्टर द्वारे पाणी घालण्यात येत असून काही झाडांना पाणी जाते तर काही झाडांना घातले जात नसल्याचे खैरेवाडी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वाल्मीक गोडसे, सरपंच रामदास मांदळे, संभाजी गोडसे, बबन सावंत, पांडुरंग खैरे, नाथा खैरे, राजाराम गोडसे, सुभाष खैरे यांनी ट्रॅक्टर द्वारे पाणी घालणाऱ्या.
ड्रायव्हर यास या रस्त्यावरील झाडांना पाणी घालणार्या कॉन्टॅक्टर चे नाव विचारले असता ट्रॅक्टर ड्रायव्हर टँकर सह ट्रॅक्टर घेऊन पळून गेला . यावरून या ग्रामस्थांनी सांगितले की झाडांना पाणी एकच टँकरने टाकायचे व पाच टँकर खेपा केले अशा दाखवायचे यामुळे सामाजिक वनीकरण खाते हजारो रुपयांचे बिल काढून अफरातफर करते की काय अशी शंका ग्रामस्थांनी येत असल्याचे खैरेवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : २९ कान्हूरमेसाई वृक्षलागवड
फोटोओळ : खैरेवाडी ( ता. शिरूर) सामाजिक वनीकरण मार्फत लावलेल्या झाडांना पाणी न घातलेले दाखवताना ग्रामस्थ