जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वतीने खोडद येथे वृक्षारोपण : शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:10+5:302021-07-22T04:08:10+5:30
ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१ अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राचा आणि जीवन पद्धतीचा अभ्यास ...
ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१ अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राचा आणि जीवन पद्धतीचा अभ्यास करता यावा म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थी सहा महिन्यांच्या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि अभ्यास करत आहेत. हा कार्यक्रम या वर्षात ऑनलाईन राबविण्यात येत असून या अंतर्गत कराड येथील कृष्णा कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील कृषिदूत सुयोग संदीप पानमंद यांच्यावतीने कृषी सप्ताहाचे औचित्य साधून खोडद या गावी बोरी रस्त्यावर तेथील शेतकाऱ्यांसोबत वृक्षलागवड केली. या वेळी जमलेल्या शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी फळ आणि देशी वृक्षांची लागवड त्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी बाबा पवळ, तुकाराम पानमंद, विनायक पवळ, सावळेराम पानमंद, मयूर घंगाळे, अतुल पानमंद, विकास खरमाळे, नवनाथ घंगाळे, महिला शेतकरी भीमाबाई पानमंद, सहिंद्रा पानमंद, यमुनाबाई पटाडे, नीता पानमंद आणि परिसरातील इतर महिला देखील उपस्थित होत्या.
--
फोटो क्रमांक : २१ खोडद
कॅप्शन : जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वतीने खोडद येथे वृक्षारोपण करून कृषिदूत सुयोग पानमंद याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.