माळेवाडीत वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:13+5:302021-07-02T04:09:13+5:30
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणत भोर तालुक्यातील डोंगरी भागात माळेवाडी या ...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणत भोर तालुक्यातील डोंगरी भागात माळेवाडी या गावात सायबेज आशा व बायफ या कंपनी मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थाच्या सहकार्यातून गावातील शेतकरी मालकीच्या क्षेत्रात ४००० क्युबेक मीटरमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा (चर खोदाई) कामे करण्यात आली. सायबेज व बायफ यांच्या प्रकल्पाअंतर्गत नर्सरी तयार करून २७ शेेेेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये चिंच, करंज, शिसव, साग, आवळा, जांभूळ, बांबू, पीपळ, खैैर, आपटा आशा अनेक जातींच्या २००० रोपांची लागवड करण्यात आली.
या वेळी ऋषिकेश भामरे, सुनील चव्हाण, मंदार कोकरे, सागर सहाने, धीरज देशमुख, राकेश कांबळे, सुनंदा गायकवाड, शहाजी कुमकर, म्हाळवडी गावचे सरपंच आकाश कुमकर, सोपान बदक, विठ्ठल शिंदे, सुदाम गोळे, शेखर देशपांडे, निवृत्ती कुमकर, ग्रामस्थ मंडळ माळेवाडी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०१ महुडे माळेवाडीत वृक्षारोपण
फोटो - माळेवाडी (ता. भोर) शिवारात सायबेज व बायफ यांचे कर्मचारी वृक्षलागवड करताना.