भिगवण येथे महिला दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:32+5:302021-03-13T04:17:32+5:30
या वेळी स्मशानभूमी येथे ७० झाडे, कब्रस्तान येथे ३० झाडे आणि भिगवण स्टेशन येथील स्मशानभूमी येथे ७० झाडे लावण्यात ...
या वेळी स्मशानभूमी येथे ७० झाडे, कब्रस्तान येथे ३० झाडे आणि भिगवण स्टेशन येथील स्मशानभूमी येथे ७० झाडे लावण्यात आली.
येथील स्मशानभूमीकरिता पेव्हर ब्लॉक आणि वॉल कंपाउंड तसेच वॉर्ड क्र.३ व ४ साठी पाण्याची टाकी बांधण्याकरिता निधीची मागणी अंकिता पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
स्व. शंकरराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी बोलताना अंकिता पाटील यांनी स्मशानभूमीसाठी पेव्हर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंड तसेच पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण, सक्षमीकरण यासाठी भविष्यात कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच शीतल शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, अशोक शिंदे, संजय रायसोनी, अभिमन्यू खटके, संपत बंडगर, जयदीप जाधव, जावेद शेख, जमीर शेख, गुराप्पा पवार, हरिश्चंद्र पांढरे, सत्यवान भोसले, दत्ता धवडे, तुषार क्षीरसागर, डॉ. प्रशांत चवरे, योगेश चव्हाण, तसेच तृप्ती जाधव, स्मिता जाधव, प्रतिमा देहाडे, दीपिका क्षीरसागर, रत्नमाला रायसोनी, तस्लिम शेख, तेजस्वी भोसले,सईबाई खडके, यमुना काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले, तर आभार तुषार क्षीरसागर यांनी मानले.
११ भिगवण वृक्षारोपण
भिगवण स्मशानभूमीत वृक्षारोपण करताना अंकिता पाटील व इतर.