माउलींच्या पालखी सोहळा मार्गावर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:43+5:302021-08-29T04:13:43+5:30

रोटरी क्लब पुणे व हेंकल कंपनीच्यावतीने दरवर्षी जेजुरी व परिसरात वृक्षारोपण, शाळांना आधुनिक शैक्षणिक साहित्यांची मदत केली जाते. शासनाच्या ...

Tree planting on the way to Mauli's Palkhi ceremony | माउलींच्या पालखी सोहळा मार्गावर वृक्षारोपण

माउलींच्या पालखी सोहळा मार्गावर वृक्षारोपण

Next

रोटरी क्लब पुणे व हेंकल कंपनीच्यावतीने दरवर्षी जेजुरी व परिसरात वृक्षारोपण, शाळांना आधुनिक शैक्षणिक साहित्यांची मदत केली जाते. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत रोटरी, हेंकल व जेजुरी नगरपालिका यांच्यावतीने शुक्रवारी जेजुरी शहरातील आनंदनगर ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी पूनम कदम, रोटरी क्लबचे अध्यक्ष कृष्णा सिंगार, डॉ. आनंद केज, रमेश गुप्ता, हेंकल कंपनीचे डॉ. प्रसाद खंडागळे, माधुरी काकडे, हर्षद झगडे, नगरसेवक गणेश शिंदे, महेश दरेकर व कंपनीचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

हेंकल कंपनीच्यावतीने पुरंदर व दौंड तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, जेजुरी व ग्रामीण भागातील दिव्यांग्य, वृद्ध, आजारी व्यक्तींना घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले. सर्व उपस्थितांचे स्वागत मुख्याधिकारी पूनम कदम यांनी केले तर, आभार नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी मानले.

२८ जेजुरी वृक्षारोपण

जेजुरी येथे पालखी मार्गावर रोटरी, हेंकल व नगरपालिकेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

280821\img_20210827_174311.jpg

?????????? ??????

Web Title: Tree planting on the way to Mauli's Palkhi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.