नीरेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:39+5:302021-06-06T04:08:39+5:30
-- नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथे शनिवार, दि. ५ रोजी सकाळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालखी ताळावर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण ...
--
नीरा :
नीरा (ता.पुरंदर) येथे शनिवार, दि. ५ रोजी सकाळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालखी ताळावर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने नीरा गावाच्या परिसरामध्ये तीनशे झाडे लावून त्याचं संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या राधा माने, सारिका काकडे, माधुरी वाडेकर यांच्या हस्ते पालखी तळावरील नाना-नानी उद्यानात पाच झाडे लावून जागतिक पर्यावरण साजरा करण्यात आला. त्याची सुरुवात म्हणून शनिवारी हे वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी उपसरपंच राजेश काकडे, विराज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित भालेराव, अनंता शिंदे, माजी उपसरपंच दीपक काकडे, विजय शिंदे, सुदाम बंडगर, शिवाजी गडदरे, नाना जोशी, भैय्या काकडे, सुजित वाडेकर, उमेश तिकोणे इत्यादी उपस्थित होते. या
--
फोटो ओळी : ०५ नीरा पर्यावरण दिन वृक्षारोपण
नीरा येथील पालखी तळावरील समता नाना-नानी उद्यानात महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.