खोरमधील झाड झाले सावलीचा आधार
By admin | Published: April 25, 2016 02:12 AM2016-04-25T02:12:41+5:302016-04-25T02:12:41+5:30
खोर (ता. दौंड) परिसरातील खिंडीचीवाडी येथील श्री गणेश मंदिरा जवळील एक वटवृक्ष गेल्या एकोणतीस वषार्पासून माणसांना, जनावरांना, वाटसरूंना दुष्काळच्या काळात सावलीचा आश्रय देत आहे.
खोर : खोर (ता. दौंड) परिसरातील खिंडीचीवाडी येथील श्री गणेश मंदिरा जवळील एक वटवृक्ष गेल्या एकोणतीस वषार्पासून माणसांना, जनावरांना, वाटसरूंना दुष्काळच्या काळात सावलीचा आश्रय देत आहे. या वृक्षाने तब्बल २९ वषार्पासूनची परंपरा जोपासली आहे.
या वटवृक्षा विषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अंकुश चौधरी म्हणाले की, शंकर गेनबा चौधरी (गुरूजी) यांनी सन १९८७ मध्ये हे झाड लावले आहे. या झाडाची चांगल्या प्रकारे वषार्नूवर्ष जोपासना करून हे झाड सध्याच्या काळात चांगल्या प्रकारे सुस्थितीत असून हे झाड अनेक लहान मुलांपासून वयोवृध्दांपर्यंत आश्रयाचे स्थान बनले आहे. शाळेच्या सुट्टयांच्या दिवसात मुले या झाडाच्या पारूंब्याला झोके घेत खेळ खेळत असतात. तसेच सुरपाट्यासारखा खेळ देखील या झाडाखाली खेळला जात असतो.
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला या वटवृक्षाला दोरखंड बांधून पुजा करत असतात. एक चांगल्या प्रकारचे शाळेच्या सुट्टयांच्या दिवसातील मुलांचे निसर्गरम्य ठिकाण झाले आहे. या ऊन्हाळयाच्या दिवसात दुपारच्या वेळेस जनावरे दिवसभर चारा, पाणी घेवून दुपारच्या वेळेत या वटवृक्षा खाली येवून सुखद गारव्याचा अनुभव घेत असतात. या वटवृक्षाच्या जवळपास २0 ते २५ पारूंब्या या जमिनीमध्ये खोलवर गेलेल्या असून हे वटवृक्ष सध्याच्या काळात चांगल्या प्रकारे हिरवेगार पानांनी बहरून दुष्काळाच्या काळात वाटसरूंच्या तसेच ग्रामस्थांच्या आश्रय देत आहे.