लग्नसमारंभातील अक्षतांचा वापर रानातल्या पाखरांसाठी
By admin | Published: April 18, 2017 02:49 AM2017-04-18T02:49:00+5:302017-04-18T02:49:00+5:30
लग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे.
अशोक खरात, खोडद
लग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, लग्नसमारंभ झाल्यानंतर वधू-वरांवर वर्षाव केलेल्या या अक्षता पायदळी तुडवल्या जाऊन कचऱ्यात जातात. या अक्षता कचऱ्यात जाऊ न देता त्या सर्व अक्षता गोळा करून दुर्गम भागातील रानातील पाखरांना टाकून या पाखरांचा पोटाचा प्रश्न सोडविण्याचा उपक्रम उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) येथील रवी जयराम हांडे यांनी गेल्या ३ वर्षांपासून सुरू केला आहे.
आपण आपल्या घासातला
घास एखाद्याला दिला तर निश्चितच आपले आणि ज्याला दिलाय त्याचीही भूक भागू शकते. पण आपण जर आपल्या घासातला घास किंवा आपल्याकडून नकळतपणे वाया जाणारे अन्नाचे कण जर निसर्गातील मुक्या जीवांना दिले, तर त्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. शिवाय आपल्या हातून पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याची सकारात्मक भावना मनाशी बाळगून रवी हांडे यांनी हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य हाती घेतले.
सध्या लग्नसराईचा काळ आहे. अनेक ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या तर काही ठिकाणी खासगी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह होत आहेत.
जुन्नर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होतात, अशा सर्वच ठिकाणी व देवस्थान ट्रस्ट असलेल्या ठिकाणी जाऊन सोहळा पार पडल्यानंतर मंडपातील किंवा हॉलमधील
सर्व अक्षता गोळा करून त्या
आणल्या जातात. या अक्षतांना खाद्यपदार्थांना वापरले जाणारे रंग लावलेले असतात.