लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:48 PM2023-03-31T19:48:17+5:302023-03-31T19:48:47+5:30

लिंगाणा चढाईसाठी कठीण असल्याने रोप व इतर उपकरणांच्या साहाय्याने चढाई करावी लागते

Trekker dies of heart attack near Lingana fort | लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लिंगाणा किल्ल्याजवळ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

googlenewsNext

पुणे: लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. हा ट्रेकर पनवेल येथून आला होता. या ट्रेकर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने किल्ल्याजवळ मंगळवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याचे नाव अजय काळे (वय-62 रा.पनवेल) असे आहे. त्यामुळे ट्रेकर्संनी गडकिल्ल्यांवर भटकंती करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये गडकिल्ले भटकंती करताना एकटा ट्रेकर हरवणे, त्याचा मदत न मिळाल्याने मृत्यू होणे, दरीत कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. तशीच घटना मंगळवारी दुपारी पुण्यातील एस. एल. ॲडव्हेंचर टीमला मदतीसाठी कॉल आला होता. त्यानंतर लगेचच आवश्यक उपकरणांनसह टीम मोहरी गावाजवळ दाखल झाली. तुषार दिघे, कृष्णा मरगळे, रोहित आंदोडगी हे तिथे गेले. रोपच्या साहाय्याने ट्रेचर बनवून त्यांना रात्रीच्या अंधारामध्ये बोराट्याची नाळ चढून मोहरी गावात आणण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तानाजी भोसले, गणेश सपकाळ यांनी रेस्क्युसाठी मोलाची मदत केली. रायगड किल्ल्याजवळ असणारा सरळसोट उभा किल्ला म्हणजे लिंगाणा. लिंगाणा चढाईसाठी कठीण असल्याने रोप व इतर उपकरणांच्या साहाय्याने चढाई करावी लागते. लिंगाणा किल्ल्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कारागृह म्हणून केला जात होता.

Web Title: Trekker dies of heart attack near Lingana fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.