दौंडमध्ये धोरणबाह्य बिगर हंगामी ऊस लागवडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:11+5:302021-05-27T04:12:11+5:30

या वर्षी आतापर्यंत उजनी धरणातील बॅक वॉटर क्षेत्रात पाण्याची पातळी समाधानकारक आहे. शिवाय गतवर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे विहिरी, ...

The trend towards non-seasonal non-seasonal sugarcane cultivation in Daund | दौंडमध्ये धोरणबाह्य बिगर हंगामी ऊस लागवडीकडे कल

दौंडमध्ये धोरणबाह्य बिगर हंगामी ऊस लागवडीकडे कल

Next

या वर्षी आतापर्यंत उजनी धरणातील बॅक वॉटर क्षेत्रात पाण्याची पातळी समाधानकारक आहे. शिवाय गतवर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे विहिरी, कूपनलिका आदी पाण्याचे स्रोतही चांगले असल्याने काही शेतकऱ्यांकडे ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध आहे.

दरवर्षी एक जुलैपासून आडसाली उसाची लागवड करण्याचे साखर कारखान्यांचे धोरण असते. यंदा मात्र दौंड शुगर कारखान्याचे लागवड धोरण बदलले असून, १५ जूनपासूनच आडसाली उसाची नोंद घेणार आहेत. पूर्व भागातील शेतकरी हे आपल्या उसाची नोंद दौंड शुगर, बारामती ॲग्रो आणि इंदापूर सहकारी या तीन कारखान्यांकडे करत असतात. तसेच येथील शेतकरी प्रामुख्याने को- ८६०३२, को एम- ०२६५ आणि एम एस- १०००१ या तीनच जाती प्रामुख्याने उसाची लागवड करतात.

सर्वसाधारणपणे उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तीनही हंगामांत केली जात असली तरी आडसाली हंगाम फायदेशीर दिसून येतो. उगवणीपासूनच आडसाली उसास अनुकूल हवामान मिळाल्याने उगवण चांगली होऊन फुटवा जोमदार येतो. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या कालावधीत आडसाली ऊस आठ ते नऊ महिन्यांचा असल्याने पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करू शकते. कीड व रोग यांचा प्रादुर्भाव सुरू व खोडवा उसाच्या तुलनेत कमी राहतो.

--

चौकट

--

उजनी धरणातील बॅकवाॅटरचे पाणी हे करमाळा, इंदापूर, कर्जत , दौंड, श्रीगोंदा या तालुक्यांतील शेतीसाठी वरदान आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदीकिनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगावराजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीच्या बॅकवाॅटरचे पाणी मिळत असल्याने या गावाची शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. हा भाग अंतिम टोकाला (टेल) असल्याने खडकवासला कालव्याचे पाणी या भागात येत नाही. अथवा जरी आले तरी टोकाचा भाग असल्याने या भागात पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी उजनी धरणातील बॅकवाॅटरच्या पाण्यावरच आपली शेती करतो. या गावातील अर्थकारणच उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहे.

--

कोट -

एमएस १०००१ या उसाची १० ते १२ महिन्यांत पक्वता होत असून साखर उताराही चांगला असतो. ऊस मऊ असल्यामुळे जास्त गाळप होऊन बगॅसचे प्रमाण तुलनेने कमी राहते. फुटवा चांगला मिळत असल्यामुळे खोडव्यासाठी फायदेशीर ठरतो. मध्यम, भारी तसेच क्षारयुक्त व चोपण जमिनीतही चांगले उत्पन्न मिळते. रोगप्रतिकारक चांगला असल्याने लोकरी मावा व इतर रोग कमी प्रमाणात होतात.

दिलीप फरगडे, उस उत्पादक शेतकरी, राजेगाव, ता. दौंड.

-

फोटो क्रमांक : २६राजेगाव ऊस

़छायाचित्र- राजेगाव (ता. दौंड) येथे ऊस लागवड करताना शेतकरी.

===Photopath===

260521\26pun_14_26052021_6.jpg

===Caption===

फोटो क्रमांक : २६राजेगाव ऊस़छायाचित्र- राजेगाव (ता. दौंड) येथे ऊस लागवड करताना शेतकरी

Web Title: The trend towards non-seasonal non-seasonal sugarcane cultivation in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.