अतिक्रमण कारवाईच्या रागातून तोडफोड
By admin | Published: March 24, 2017 04:24 AM2017-03-24T04:24:10+5:302017-03-24T04:24:10+5:30
महापालिकेला अतिक्रमणविरोधी कारवाई करायला सांगितल्याच्या संशयावरून सोसायटीच्या अध्यक्षाच्या दुकानांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले.
पुणे : महापालिकेला अतिक्रमणविरोधी कारवाई करायला सांगितल्याच्या संशयावरून सोसायटीच्या अध्यक्षाच्या दुकानांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास येरवड्यातील शांतीरक्षक सोसायटीमध्ये घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रसाद ऊर्फ भैयू देसाई, आसिफ खान, नासीर खान व शाहरुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कल्पना सांगळे (वय ५०, रा. शांतीनगर सोसायटी, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना यांचे पती लुईस सांगळे हे शांतीरक्षक सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांची येथेच आशीर्वाद फ्लोअर मिल व आशीर्वाद लाँड्री अशी दोन दुकाने आहेत. आरोपींची सोसायटीच्या आसपास दुकाने होती. त्याच्यावर बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. सहायक निरीक्षक मारोडे पुढील तपास करीत आहेत.