आदिवासी कातकरी समाज शासकीय योजनांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:03+5:302021-02-24T04:13:03+5:30

पानशेत जवळील कुरण खुर्द येथील अडीच वर्षिय मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. या मुलीच्या पिडीत कुटुंबियांची ...

Tribal Katkari community deprived of government schemes | आदिवासी कातकरी समाज शासकीय योजनांपासून वंचित

आदिवासी कातकरी समाज शासकीय योजनांपासून वंचित

Next

पानशेत जवळील कुरण खुर्द येथील अडीच वर्षिय मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. या मुलीच्या पिडीत कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांतवन केले. त्यावेळी त्यांनी कातकरी समाजातील नागरीकांचे प्रश्न समजून घेतले. आदिवासी कातकरी समाजातील नागरीकांसाठी शासकीय योजना असूनही केवळ अपुऱ्या कागदपत्रांमुळे त्यांना त्याचा फायदा मिळत नाही, असे स्पष्ट करून चाकणकर म्हणाल्या की, आदिवासी कातकरी समाज कष्टकरी समाज आहे. त्यांच्याकडे जातीचा पुरावा नसल्याने त्यांना कोणताही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहतात. जातीचे दाखले शासनाने त्यांच्या वस्तीवर जाऊन द्यावेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याशी चाकनकर यांनी दुरध्वनिवरून संपर्क साधला. या नागरीकांना शिबीर घेऊन दाखले देऊ असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Tribal Katkari community deprived of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.