आदिवासी तरुणांनी समाजात आपले स्थान निर्माण करावे : आनंद काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:35+5:302021-08-15T04:12:35+5:30

मेखळी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा बारामती: आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये भरीव काम ...

Tribal youth should create their place in the society: Anand Kale | आदिवासी तरुणांनी समाजात आपले स्थान निर्माण करावे : आनंद काळे

आदिवासी तरुणांनी समाजात आपले स्थान निर्माण करावे : आनंद काळे

Next

मेखळी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

बारामती: आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये भरीव काम करून आपले निश्चित स्थान निर्माण करणे गरजे आहे. आपला तरुण प्रत्येक व्यासपीठावर समोर आला तरच समाजाची प्रगती होणार आहे, असे मत आदिवासी पारधी समाज परिषदेचे राज्य समन्वयक आनंद काळे यांनी व्यक्त केले.

मेखळी येथे जागतिक आदिवासी दिन शनिवारी (दि. १४) साजरा करण्यात आला. या वेळी आनंद काळे बोलत होते. यानिमित्त आदिवासी शूरवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य समन्वयक वैभव काळे यांनी आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांनी यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत नाव उज्जवल करून करून समाजाची मान उंचावावी, असे मत व्यक्त केले. आदिवासी पारधी समाजाला शासनाने योग्य दिशा देण्याऐवजी, समाजाची दशा केली. आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणून समाजाला योग्य न्याय दिला पाहिजे असे मत राज्य समन्वयक बापूराव काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर काळे, सचिन काळे, अश्विनी भोसले, सविता भोसले, आकाश भोसले, अमोल काळे, अमोल भोसले, सूरज काळे, महेंद्र काळे आदींनी सहकार्य केले.

मेखळी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी शूरवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

१४०८२०२१-बारामती-०५

Web Title: Tribal youth should create their place in the society: Anand Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.