पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासींनी रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:04+5:302021-02-12T04:11:04+5:30

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील व भीमाशंकर परिसरातील स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती साठी पुढाकार घ्यावा, ...

Tribals should take initiative for job creation through tourism | पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासींनी रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासींनी रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

googlenewsNext

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील व भीमाशंकर परिसरातील स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती साठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर-दातार यांनी व्यक्त केले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथील शहीद राजगुरू ग्रंथालय, येथे महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सोशल मिरर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटनक्षेत्रातील विविध संधी’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी सुप्रिया करमरकर- दातार बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मनोज हाडवले, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, जी.एस.टी.चे उपायुक्त महेश जगताप, माजी नायब तहसीलदार विजय केंगले, समीर गारे, रवींद्र वायाळ, अशोक पेकारी, कांताराम लोहकरे, दत्तात्रय लोहकरे आदी उपस्थित होते.

सुप्रिया करमरकर-दातार म्हणाल्या, शिस्तबद्ध व शाश्वत पर्यटन या भागात दीर्घकालीन रोजगार निर्मिती करू शकते. यासाठी भीमाशंकर परिसरातील स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून आपला व आपल्या परिसराचा विकास करावा.

एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ९० प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींना शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती सांगण्यात आली. भीमाशंकर परिसरासह इतर भागात सांस्कृतिक ओळख जपत पर्यटनाच्या अनुषंगाने रोजगार निर्मितीची विविध क्षेत्र काय असू शकतात आदी विविध पर्यटन क्षेत्रातील माहिती सांगण्यात आली.

११ तळेघर पर्यटन

शिबिरात बोलताना सुप्रिया करमरकर-दातार.

Web Title: Tribals should take initiative for job creation through tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.