26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
By admin | Published: November 26, 2014 11:32 PM2014-11-26T23:32:28+5:302014-11-26T23:32:28+5:30
लोकमंगल मल्टीस्टेट बँक आणि रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशन आवारात 26 /11 ला शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
Next
भिगवण : लोकमंगल मल्टीस्टेट बँक आणि रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशन आवारात 26 /11 ला शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
सुनील धवडे आणि संजय भरणो यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी शहीदांच्या प्रतीमेस हार घालून तसेच जमलेल्या नागरिकांनी पुष्प अर्पण करून वीरांना श्रद्धांजली दिली. यावेळी बोलताना तुकाराम बंडगर यांनी शहीद झालेल्या वीरांनी आपल्या मायभूमीसाठी बलिदान दिले आहे. ते कधीही व्यर्थ जाणार नसल्याचे सांगितले. भिगवण पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मार्गदर्शन केले. लोक पोलिसांच्या पाठीमागे खंभीर उभे असल्याने पोलीससुद्धा संकटात लोकांसाठी जीवाची बाजी लावताना मागे हटत नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच, 26/11 च्या मुंबईवरील हल्ला परतावून लावताना शहीद झालेले वीर जवान प्रेरणास्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी सरपंच पराग जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सरतापे, शेतकरी संघटनेचे गुलाबराव कन्हेरकर, हनुमंत बंडगर, महेश शेंडगे, सचिन बोगावत, संजय खाडे, अशोक वणवे, माऊली मारकड, संजय देहाडे यांच्यासह लोकमंगल बँकेचे कामगार, मदनवादी, तक्रारवाडी आणि भिगवण नागरिक उपस्थित होते.