पिंगोरी येथे कारगील युद्धातील शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:22+5:302021-07-28T04:12:22+5:30
पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कारगीलच्या युद्धात शहीद झालेल्या ...
पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कारगीलच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले.
शहीद शंकर शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, सागर शिंदे व शहीद रमेश शिंदे यांचे पुत्र प्रकाश शिंदे यांनी यावेळी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे हे कारगीलमध्ये झालेल्या युध्दात शहीद झाले होते. त्याच बरोबर शहीद रमेश शिंदे हे श्रीलंकेत शांती सेनेत असताना शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ पिंगोरी येथे शहीद स्मारक बांधण्यात आले आहे. दरवर्षी सर्व राष्ट्रीयसण स्मारक समोर साजरे केले जातात. कारगील विजय दिनी येथे अनेक लोक शहिदांना अभिवादन करीत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी व यावर्षी सुधा निवडक लोकांच्या उपस्थितीत कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शहीद शंकर शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, तसेच शहीद रमेश शिंदे यांचे पुत्र प्रकाश शिंदे यांनी या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, ग्रामस्थ विजय शिंदे, यांसह काही ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो आहे :