शिष्यांकडून मृदंग वादनातून पंडित गोविंद भिलारे यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:17+5:302021-08-28T04:16:17+5:30

यावेळी पं. गोविंद भिलारे यांचे शिष्य आकाश तुपे, ज्ञानेश कोकाटे, सिद्धेश उंडाळकर, ज्ञानेश्वर दुधाणे, मनीष तांबोसकर, गणेश चौधरी, स्वप्निल ...

Tribute to Pandit Govind Bhilare by playing Mridang by the disciples | शिष्यांकडून मृदंग वादनातून पंडित गोविंद भिलारे यांना श्रद्धांजली

शिष्यांकडून मृदंग वादनातून पंडित गोविंद भिलारे यांना श्रद्धांजली

googlenewsNext

यावेळी पं. गोविंद भिलारे यांचे शिष्य आकाश तुपे, ज्ञानेश कोकाटे, सिद्धेश उंडाळकर, ज्ञानेश्वर दुधाणे, मनीष तांबोसकर, गणेश चौधरी, स्वप्निल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर हिरगुडे, भूषण भागवत यांनी बहारदार पखावजवादन केले. त्यानंतर युवा गायक नागेश आडगावकर याने ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म'' आणी ''धिरे धिरे रे मना अभंग सादर केले. त्यानंतर प्रसिध्द बासरी वादक पं. सुनील अवचट यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग अभोगी मधे अतिशय सुंदर असा आलाप जोड झाला सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रख्यात गायक पं. समीर दुबळे यांच सुंदर गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांमध्ये त्यांनी राग अमृत वार्षिनी विलंबित झपतालातील व मारुबिहागमधील बंदिश गायली नंतर आधी रचली पंढरी हा अभंग गाऊन शिव के मन शरण हो या सुंदर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

या सर्व कलाकारांना समर्पक साथ किशोर कोरडे, देवेंद्र देशपांडे, सिद्धेश उंडाळकर, चारुदत्त फडके, हार्मोनियम देवेंद्र देशपांडे यांनी केली. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळींनी पं. गोविंद भिलारे यांनी निर्माण केलेल्या पखावजविश्वाचा प्रचार अन् प्रसार केलेल काम शिष्यांच्या वतीने असच एकजूटीनं पुढं नेण्याच करणार असल्याचे अभिवचन आकाश तुपे यांनी दिले. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. गणेश भगत यांनी केले. यावेळी गोविंद भिलारे यांचे भाऊ नारायण भिलारे, भगवान भिलारे पत्नी मनीषा भिलारे, श्रेया भिलारे, शिवतेज भिलारे व किकवीतील रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आकाश तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Tribute to Pandit Govind Bhilare by playing Mridang by the disciples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.