जलतरणात तनिश, रूद्र यांचा ट्रिपल धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:26 AM2018-08-27T02:26:00+5:302018-08-27T02:26:31+5:30
१४ वर्षांखालील गट : आरूष बढे, इशान खरे २ प्रकारांत अव्वल
पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय जलतरण स्पर्धेत तनिश कुंडले आणि रूद्र इंगळे या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करताना १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये ३ प्रकारांत विजेतेपद पटकावले. आरूष बढे, इशान खरे २ प्रकारांत अव्वल अव्वल ठरले. डेक्कन जिमखान्याच्या टिळक जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलचा खेळाडू असलेल्या तनिश कुडले याने १०० मीटर आणि २०० मीटर बटरफ्लाय तसेच २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात बाजी मारली. त्याने १०० मीटर प्रकारात १ मिनिट ८.२१ सेकंद तर, २०० मीटरमध्ये २ मिनिटे ३०.८० सेकंद अशी वेळ दिली. सेवासदनच्या रूद्र इंगळे याने ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारांत विजेतेपद प्राप्त केले.
मिलेनियमचा आरूष बढे ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारांत अव्वल ठरला. न्यू इंडिया स्कूलच्या इशान खरे याने २०० आणि ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात अव्वल स्थान पटकावले. ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात न्यू इंडिया स्कूलच्या संघाने ४ मिनिटे ५९.६७ सेकंद वेळेसह बाजी मारली. ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात ५ मिनिटे १८.२८ सेकंद अशी वेळ देणाऱ्या मिलेनियम संघाने प्रथम स्थान प्राप्त केले.
निकाल : १४ वर्षांखालील मुले
५० मीटर फ्रीस्टाईल : आरूष बढे (मिलेनियम, २८.१६), सलील भागवत (विद्याभवन, ३१.९८), आरव पेटकर (अभिनव इंग्रजी माध्यमिक शाळा, ३२.२५). १०० मीटर फ्रीस्टाईल : आरूष बढे (मिलेनियम, १ मिनिट ३.२० सेकंद), इशान खरे (न्यू इंडिया, १.७.२६), वरूण चव्हाण (क्रूट मेमोरियल, १.९.२३). २०० मीटर फ्रीस्टाईल : इशान खरे (न्यू इंडिया, २.३०.७८), हर्ष दात्ये (मिलेनियम, २.४०.२२), ऋषी सहस्रबुद्धे (गुरूकुल, २.४१.२२). ४०० मीटर फ्रीस्टाईल : इशान खरे (न्यू इंडिया, ५.२६.१७),
हर्ष दात्ये (मिलेनियम, ५.४०.७६), ऋषी सहस्रबुद्धे (गुरूकुल, ५.४०.८८). ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल
रिले : न्यू इंडिया स्कूल (४ मिनिटे ५९.६७ सेकंद), डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल (५.११.३३), अभिनव इंग्रजी माध्यमिक स्कूल (५.२०.७१).
५० मीटर बटरफ्लाय : अर्णव भादेकर (मिलेनियम, ३२.६५ सेकंद), इशान लोपिस (लॉयला, ३२.६६), अर्णव मुंडले (डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, ३३.७४). १०० मीटर बटरफ्लाय : तनिश कुडले (मएसो भावे स्कूल, १.८.२१), अन्वेश प्रसादे (न्यू इंडिया, १.११.४६), अर्णव भादेकर (मिलेनियम, १.१६.९४). २०० मीटर बटरफ्लाय : तनिश कुडले (मएसो भावे स्कूल, २.३०.८०), अर्णव भादेकर (मिलेनियम, २.५५.४१), चैतन्य पाटील (सेंट व्हिन्सेंट, ३.१५.९३).
५० मीटर बॅक स्ट्रोक : रूद्र इंगळे (सेवासदन, ३३.९१), सलील भागवत (विद्याभवन, ३९.७३), अथर्व सुतार (बिशप्स, ४२.११). १०० मीटर बॅकस्ट्रोक : रूद्र इंगळे (सेवासदन, १.१३.६७), इथान लोपिस (लॉयला, १.१९.९७), हर्षवर्धन चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल, शनिवारपेठ, १.२३.८३). २०० मीटर बॅक स्ट्रोक : रूद्र इंगळे (सेवासदन, २.४२.१४), हर्षवर्धन चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल, २.५५.२१), हर्ष दात्ये (मिलेनियम, ३.२.६).
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : पार्थ कुंडले(सह्याद्री नॅशनल स्कूल, ३९.५८), पार्थ महाजन (मिलेनियम, ४०.४९), अभिजित कोपर्डे (भारती विद्यालय, ४०.६३). १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : वरूण चव्हाण (क्रूट मेमोरियल, १.२४.३४), आरव पेटकर (अभिनव इंग्रजी माध्यमिक शाळा, १.२७.९०), पार्थ महाजन (मिलेनियम, १.२७.९३). २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : अन्वेश प्रसादे (न्यू इंडिया, २.५७.३१), आरूष बढे (मिलेनियम, ३.०.७९), पार्थ कुडळे (सह्याद्री नॅशनल स्कूल, 3.१९.८३).
४ बाय १०० मीटर मिडले रिले : मिलेनियम (५ मिनिटे १८.२८ सेकंद), न्यू इंडिया (५.२७.१४), डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल (६.२.८०). २०० मीटर वैयक्तिक मिडले : तनिश कुडले (मएसो भावे स्कूल, २.३७.१२), अन्वेश प्रसादे (न्यू इंडिया, २.४१.९), चैतन्य पाटील (सेंट व्हिन्सेंट, २.५६.८२).