त्रिवेणी संगमावर दीपोत्सव, भीमा-भामा इंद्रायणीचा तट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 12:49 AM2018-11-07T00:49:22+5:302018-11-07T00:49:48+5:30

भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर.

 Triveni Sangamwar Deepotsav, Bhima-Bhima Indrayani coast | त्रिवेणी संगमावर दीपोत्सव, भीमा-भामा इंद्रायणीचा तट

त्रिवेणी संगमावर दीपोत्सव, भीमा-भामा इंद्रायणीचा तट

googlenewsNext

लोणी कंद : भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर.
तुळापूर (ता. हवेली) येथील छत्रपती संभाजीराजेंच्या ऐतिहासिक बलिदानस्थळी शंभुशौर्य दिपोत्सव सोहळा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे व आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रदीप कंद, गणपत फुलवरे, हरकचंद्र ढोका, इतिहासतज्ञ दत्तात्रय नलावडे, मनसे जिल्हाध्यक्ष संदिप सातव, मिलिंद हरगुडे, दिपक गावडे, सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी शिवसेना व सरकारच्या धोरणांवर टिका केली. छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी उत्तुंग व अभिमानास्पद असूनही त्यांचा खरा इतिहास लपवून पुस्तकाद्वारे त्यांच्या बदनामीच्या होणाऱ्या प्रयत्नांना पायबंद घालण्याचे काम सध्याच्या पिढीने करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सरकारची विकासाची भुमिका मांडत वढु बुद्रुक व तुळापूरची ऐतिहासिक स्थळे जोडणारा प्रशस्त पुल शासन उभारत असून या परिसरात होत असलेल्या विकास कामांचाही आढावा त्यांनी घेतला.
आयोजक शेखर सक्करगे पाटील, सचिन जाधव, शंकर जाधव व सहकाºयांनी शंभु भक्तांसमवेत शंभुराजांच्या समाधी स्थळी जागोजागी दीप प्रज्वलनाने मराठमोळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. यावेळी पंचक्रोशीतून युवावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. संतोष शिवले यांनी आभार मानले.

ऐतिहासिक भूमीत दिवाळीनिमित्ताने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी येसाजी कंक याचे वंशज आकाशराजे कंक, धनाजी जाधव यांचे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, निंबाळकर राजघराण्यातील शिवरूपराजे खर्डेकर यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला एक उंची आली होती.

Web Title:  Triveni Sangamwar Deepotsav, Bhima-Bhima Indrayani coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.