दौंडमध्ये पाच ब्रास वाळूसह ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:39+5:302021-05-26T04:11:39+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मेरी मेमोरियल हायस्कूलच्या जवळ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहने असल्याची माहिती पोलिसांना ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मेरी मेमोरियल हायस्कूलच्या जवळ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे आणि पोलीस घटनास्थळी आले तेव्हा वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर ट्रॉली बाजूला घेण्यास सांगितली. असता ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर ट्रॉली जागीच सोडून पळून गेला. दरम्यान वाळूने भरलेला ट्रक (एम.एच. १६, क्यू , ७८२६) पाठीमागून येत होता. या वेळी ट्रकचालकाने पोलिसांना पाहताच एका ढाब्याजवळ ट्रक सोडून चालक पळून गेला. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून वाहनांचे चालक आणि मालक यांचा शोध घेत असून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---२५ दौंड : २५ दौंड वाळू वाहतूक
दौंड - पाटस रोडवर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, योगेश गोलांडे, नीलेश वाकळे खाजगी वाहनातून गस्त घालीत होते.