Video: पुण्यात दारुने भरलेला ट्रक झाला पलटी; नागरिकांनी पळवले दारूचे बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:15 PM2021-10-29T12:15:03+5:302021-10-29T14:20:55+5:30
बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक वाहन चालकाचे नियंञण सुटल्याने पलटी झाला
उंडवडी कडेपठार : बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक वाहन चालकाचे नियंञण सुटल्याने पलटी झाला. ट्रकमध्ये ६५ लाख रुपये किमतीचे ९५० बॉक्स भरले होते. अशी माहिती चालक निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
दारुने भरलेला ट्रक झाला पलटी; बाटल्या पळवण्यासाठी लोकांची झुंबड#Baramati#Punenewspic.twitter.com/nzw1uU6Ehe
— Lokmat (@lokmat) October 29, 2021
पिंपळी (बारामती) येथील कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना वा-यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. परंतु ड्रायव्हर व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नाही. सकाळ पर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर भर दिला असताना बारामती ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पळ काढला.
दारू घेऊन जाण्यात महिलांचाही सहभाग
गाडी ड्रायव्हर निलेश गोसावी व क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये. यासाठी प्रयत्न केल्यावर ड्रायव्हर मारहाण करण्यात आली. तसेच नागरिकांनी गाडीची ताडपत्री सतुर या हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले. विशेष म्हणजे यात महिला ही सामील झाल्याची माहिती गाडी चालक यांनी दिली.