पारंपरिक वस्त्र संस्कृतीमध्ये खरे सौंदर्य : मुरलीधर मोहोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:09 AM2021-07-20T04:09:09+5:302021-07-20T04:09:09+5:30
पुणे : “भारतीय पारंपरिक वस्त्र संस्कृतीमध्ये खरे सौंदर्य दडलेले असून, भारतीय वस्त्र संस्कृती आजही पाश्चात्य देशांच्या कुतूहलाचा विषय ठरतो, ...
पुणे : “भारतीय पारंपरिक वस्त्र संस्कृतीमध्ये खरे सौंदर्य दडलेले असून, भारतीय वस्त्र संस्कृती आजही पाश्चात्य देशांच्या कुतूहलाचा विषय ठरतो, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
भारतातील पारंपरिक कला, संस्कृती, वस्त्रसंस्कृती, शिल्पसंस्कृती आदी कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘छांदसी’ या उपक्रमांतर्गत कोथरूड येथील स्वामिकृपा सभागृहात सोमवार (दि. १९) पासून प्रदर्शनास सुरुवात झाली. या पैठणी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
याटवेळी प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राष्ट्रीय हातमाग विभागाकडे नोंदणीकृत आणि केंद्र शासनाचे गुणांकन लाभलेले येवल्याचे पैठणी कलाकार मनोज दिवटे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, नगरसेविका ज्योती करमळकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि उपक्रमाच्या संयोजिका सुमित्रा भांडारी आदी उपस्थित होते.