आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फक्त ४८ तासांत पोलिसांना आले तब्बल १७ हजार ४७९ संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:44 PM2020-03-26T12:44:39+5:302020-03-26T12:44:51+5:30

आलेल्या संदेशांपैकी ७ हजार ६१५ तातडीचे संदेश

...but true! More than 17thousands 479 messages to the police in two days | आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फक्त ४८ तासांत पोलिसांना आले तब्बल १७ हजार ४७९ संदेश

आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फक्त ४८ तासांत पोलिसांना आले तब्बल १७ हजार ४७९ संदेश

Next
ठळक मुद्दे८० टक्क्यांना परवानगी : ट्विटरवर ५ हजार मेसेज

पुणे : लॉकडाऊन केल्यानंतर गेल्या दोन दिवसात पोलिसांच्या चार व्हॉटसअप क्रमांकावर तब्बल १७ हजार ४७९ संदेश प्राप्त झाले़.त्यापैकी तब्बल ८० टक्के संदेशांना पोलिसांनी परवानगी दिली. 
आलेल्या संदेशांपैकी ७ हजार ६१५ तातडीचे संदेश होता. या संदेशापैकी ५० टक्के वैद्यकीय सेवा परवानगी मिळावी, यासाठी होत. त्यामध्ये कॅन्सर, मधुमेह, अल्जायमर, डायलीसीस, गरोदर महिला वगैरे याबाबत होते. २० टक्के हॉस्पिटल सेवा संदर्भात स्टाफ, नसेर्से, पॅथोलॉजी यांचे संदर्भात होते. त्यांना परवानगी देण्यात आली़ तसेच ५ टक्के विद्यार्थी जे होस्टेलमध्ये राहत आहेत व त्यांना जेवणाबाबत गैरसोय होत असल्याबाबत होते. ५ टक्के वयोवृद्ध आईवडिल, पत्नी, लहान मुले यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी घेऊन जाण्याबाबत परवानगीबाबत होते. त्यांना परवानगी देण्यात आली. 
पोलिसांच्या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर आलेल्या संदेशापैकी आज दिवसात ५ हजार ६८३ संदेशांना उत्तर देण्यात आले़. 
कंपन्यांकडून आतापर्यंत २३३ ई मेल पोलिसांना मिळाले असून त्यांना डिजिटल परवाने दिले जात आहेत. 
पोलिसांकडे , फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप आणि पुणे पोलिसांच्या संकेत स्थळावरुन सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे. ट्विटरमार्फत सुमारे ५ हजार संदेश प्राप्त झाले आहेत. तसेच त्यावरुन नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये, तसेच उपलब्ध असलेल्या प्रतिबंधक सूचनांकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात येत आहे. 
बंगलुरु येथून नुकतेच पुण्यात बदली होऊन आलेल्या दांपत्यांचे घरगुती सामान ट्रॉन्सपोर्टमध्ये अडकले होते. या ट्रान्सपोर्टला संपर्क साधून या दांपत्याची समस्या निवारण करण्यात आली. 
पुण्यामध्ये कामानिमित्त आईवडिलांना सोडून एक तरुणी एका ठिकाणी रहात होती. त्या ठिकाणी ती एकटी असल्यामुळे अस्वस्थ होती़.तिने पोलिसांकडे मदत मागितली़. तिला योग्य मार्गदर्शन करुन तिचे वडिलांमार्फत पुण्यामध्ये दुसरीकडे तिची राहण्याची सोय झाल्यावर त्या ठिकाणी तिला पोलिसांनी जाण्यासाठी मदत केली, असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी कळविली आहे.

Web Title: ...but true! More than 17thousands 479 messages to the police in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.